35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यप्रारंभ वैश्विक परिवर्तनाचा

प्रारंभ वैश्विक परिवर्तनाचा

टीम लय भारी

येत्या वर्षात आपले संपूर्ण विश्व बदलले आहे. आपली जीवनशैली, सवयी, नाती inया सर्वांनी एक फार मोठा बदल अनुभवला आहे. आपल्या अर्थव्यवस्थेला पोचलेला धक्का आणि भविष्याच्या अनिश्चिततेमुळे भीती, डिप्रेशन, आत्महत्या, गोंधळ, अव्यवस्था असे शब्द आता वारंवार आपल्या रोजच्या वापरात येऊ लागले आहेत. नैसर्गिक आपत्ती देखील येत आहेत आणि आपण मान्य करू अथवा नाही, परंतु ही केवळ सुरुवात आहे. आपली पृथ्वी माता कित्येक शतकांपासून अश्रूपूर्ण नयनांनी आपणास बदलण्यास सांगत आहे. परंतु तिच्या रडण्याने किंवा हुंकाराने देखील आपण आपले मार्ग बदलले नाही. सरतेशेवटी तिने परिस्थिती स्वतःच्या हातात घेतली आहे आणि आपल्या या सर्व खोडकर मुलांना स्वतःच्याच घरांमध्ये बंदिस्त केले आहे कि यातून आपण त्यातून आपला धडा शिकू. खरेतर मित्रहो, अशी एक परम शक्ती आहे जी आपल्या आयुष्यात मार्गदर्शन करते आणि या संपूर्ण गोंधळातून शांतिकड़े नेते, या सर्वाचे उत्तर म्हणजेच परिवर्तनाकडे नेते. हे सर्व बाह्य अडथळे व गोंधळ आपल्याकडून एका आंतरिक बदलाची मागणी करतात – आपल्या विचारसरणी व आपल्या जीवनाकडे एकंदरीत असलेल्या आपल्या दृष्टिकोनामध्ये. हे परिवर्तन आपल्या चैतन्याच्या सखोल स्तरांपलीकडे आपल्या आत्म्याच्या अनावृत्, अज्ञात स्तरांमधे घडले पाहिजे. ज्या परिवर्तना विषयी आम्ही बोलत आहोत तो एक कायमस्वरूपी बदल आहे जो प्रत्येकास एक सकारात्मक, आनंदमय, शांतीमय व इतरांप्रती प्रेम अशी नैसर्गिक मानसिक स्थिति प्रदान करते.

आपल्या सर्वांची इच्छा आहे एका आनंदी विश्वात जगण्याची जिथे हवा स्वच्छ असेल, अन्न ताजे असेल व आयुष्य गुणवत्ता उत्तम असेल. असे हे स्वप्न प्रत्यक्षात तेव्हाच उतरू शकते जेव्हा आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवू. हे दैविक विजन सत्य करण्यासाठी गरज आहे ती प्रत्येका मध्ये परिवर्तन घडवण्याची. मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक आणि विजनरी मैत्रेय दादाश्रीजीनी वर्ल्डवाइड ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम म्हणजे वैश्विक परिवर्तन कार्यक्रम हा नवीन उपक्रम त्या सर्वांकरिता योजला आहे ज्यांना आयुष्यात एक चांगले उज्ज्वल भविष्य घडवायचे आहे. दोन वर्ष 25 सेशन असलेला हा उपक्रम या कार्यक्रमांमध्ये हा कार्यकम संपूर्णतः अनुभवशील व चिंतनशील असेल. ह्या कार्यक्रमाचा भर सत्य ज्ञानावर आहे ज्यामुळे नको असलेले अज्ञानतेचे थर दूर होतात व आपण स्वतःच्या सत्य दैविक स्वरूपात उन्मलित होतो.

प्रत्येक साधकाला परिवर्तनाच्या या यात्रेमधे वैयक्तिक मार्गदर्शन दिले जाईल. ज्याप्रकारे समुद्रात टाकलेला एक दगड देखील खूप साऱ्या लाटा निर्माण करतो अगदी तसेच एका मध्ये घडलेले परिवर्तन इतरांसह मानवीय चैतन्यामधे सामूहिक परिवर्तन प्रक्रिया घडवतं.

मानवीय चैतन्याच्या उत्थाना करिता मैत्रीबोध परिवार 2013 पासून कार्यरत आहे. आपल्या विविध अध्यात्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांद्वारे या विश्वामध्ये प्रेम व शान्ति प्रस्थापित करण्याच्या एकमेव हेतुने प्रेरित अथक प्रयत्न करत आहे. त्यांच्या युवा शाखेने या लॉकडाउनच्या आगामी कठिण काळामध्ये देशातील विविध दुर्गम भागातील हजारो कुटुंबापर्यंत अन्नधान्य पुरवठा केला आहे. ,एक विश्व, एक परिवार, या एकमेव उद्देशासह कार्यरत मैत्रेय दादाश्रीजींनी जगभरातील सर्व आध्यात्मिक नेते, अध्यात्मिक गुरूंना त्यांच्या सह एकत्रित येत परिवर्तन या विषयावर बोलावे व त्यांच्या अनुयायी व शिष्यांना निस्वार्थ प्रेम व शांतिपूर्ण चांगल्या उज्ज्वल विश्वाकरिता मार्गदर्शन करावे अशी विनंती केली आहे. त्यांनी सर्व सच्च्या अध्यात्मिक साधकांना आणि समाजाप्रती बांधिलकी असणाऱ्या प्रत्येकास आमंत्रित केले आहे. या शांतता उपक्रमामधे सामील होण्यासाठी – पृथ्वी मातेला संतोष प्रदान करण्यासाठी, प्रत्येकास वैश्विक चैतन्यासह संरेखित करण्यासाठी आणि आगामी काळासाठी मानवतेस तयार करण्यासाठी. ते म्हणतात- “ दुःखाचा प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात आपल्याकडून एक बदल मागतो तो बदल घडू द्या. जेव्हा आपण परिवर्तीत होतो तेव्हा आपली प्रगती होते.”

मैत्रीबोध परिवारासह या वैश्विक परिवर्तना मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया www.maitribodh.org/transform इथे लॉग इन करा किंवा [email protected] इथे ई-मेल करा.

चला परिवर्तन घडवूया स्वतः मध्ये !!

चला परिवर्तन घडवूया विश्वामध्ये !!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी