36 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeएज्युकेशनWomen Empowerment : कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे करिअरला ब्रेक? अशा महिलांसाठी आनंदाची बातमी!

Women Empowerment : कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे करिअरला ब्रेक? अशा महिलांसाठी आनंदाची बातमी!

तंत्रज्ञान क्षेत्रातील 'पर्सिस्टंट सिस्टम्स' महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार, 'विंग्स' (WINGS) या उपक्रमांतर्गत तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या महिलांना काम करण्याची संधी मिळणार

अनेकदा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांना आपले उत्तमपणे चाललेले करिअर सोडून द्यावे लागते. त्यानंतर पुन्हा करिअरकडे वळताना देखील अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. मात्र, आता अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पर्सिस्टंट सिस्टम्स’ या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठासोबत एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार, ‘विंग्स’ (WINGS) या उपक्रमांतर्गत कौटुंबिक जबाबादऱ्यांमुळे करिअर पासून १ ते ४ वर्षे दूर राहिलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

यासाठी विंग्स (WINGS) या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाव्दारे आवश्यक ती कौशल्ये विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील आणि पर्सिस्टंट सिस्टम्सव्दारे प्रत्यक्ष काम करत असताना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पर्सिस्टंट सिस्टीमद्वारे नियुक्त केले जाईल. मुंबईत मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठातर्फे राज्यभरातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Bullet Train : पंतप्रधानांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन 2026साली धावणार; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Nashik Fake Currency Notes : नाशिकात ईडलीवाल्या अण्णाचा झोलमाल; तब्बल इतक्या लाखांच्या बनावट नोटा जप्त

Beed News : ‘तुम्हाला रेशनची काय गरज…’ म्हणत ग्रामपंचायत सदस्याचा धारधार शस्त्राने भोसकून खून

या संकेतस्थळाला भेट द्यावी
विद्यापीठाने अलीकडेच इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टीफिशियल इन्टलिजन्स, सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्री 4.0, बिझनेस ऍनालिटिक्स आणि बीबीए रिटेल सारख्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांतर्गत एमटेक सारखे उच्च कौशल्यांचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या अभियांत्रिकी आणि विज्ञान कौशल्य संस्थांबरोबर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या https://mssu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले आहे.

पुन्हा काम करण्याची संधी मिळणार
” विंग्स (WINGS) या उपक्रमांतर्गत कौटुंबिक जबाबादऱ्यांमुळे करिअर पासून १ ते ४ वर्षे दूर राहिलेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या महिलांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार आहे. केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिला चांगल्या करिअरपासून वंचित राहतात. त्यांच्यात योग्य क्षमता असूनही त्यांची प्रगती होऊ शकत नाही. यादृष्टीने विंग्स हा या तंत्रकौशल्ये आत्मसात केलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक सामाजिक उपक्रम आहे.” असे कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी