30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रBeed News : 'तुम्हाला रेशनची काय गरज...' म्हणत ग्रामपंचायत सदस्याचा धारधार शस्त्राने...

Beed News : ‘तुम्हाला रेशनची काय गरज…’ म्हणत ग्रामपंचायत सदस्याचा धारधार शस्त्राने भोसकून खून

'तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात.. तुम्हाला रेशनची काय गरज...' असे म्हणत शिवीगाळ करत ग्रामपंचायत सदस्याला रेशनच्या रांगेतून हकलून लावत सायंकाळच्या दरम्यान याच वादाच्या रागातून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे.

‘तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात.. तुम्हाला रेशनची काय गरज…’ असे म्हणत शिवीगाळ करत ग्रामपंचायत सदस्याला रेशनच्या रांगेतून हकलून लावत सायंकाळच्या दरम्यान याच वादाच्या रागातून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. एका ग्रामपंचायत सदस्याचा दिवसाढवळ्या धारधार चाकूने खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करत आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. गोरखनाथ घनगाव असे या ग्रामपंच्यात सदस्याचे नाव आहे. घनगाव हे चनई ग्रामपंचायतीचे सदस्य होते. या खून प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 17 जणांवर ॲट्रॉसिटीसह हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 11 जणांचा शोध घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

Weather Change Effects : बदलत्या हवामानात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचे नियमित पालन करा

Mumbai Rape Case : मुंबईतील धक्कादायक बलात्कार प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा

गोरखनाथ दसऱ्या दिवशी (बुधवारी) रेशन घेण्यासाठी रेशन दुकानात गेले होते. यावेळी दुकानदार रमेश कदम, सुरज कदम आणि धीरज कदम यांनी गोरखनाथ यांना शिवीगाळ करत ‘तुम्हाला रेशनची काय गरज… तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात…’ असे म्हणत मारहाण करत त्यांना दुकानातून परत पाठवले. त्यानंतर दुपारी गोरखनाथ शेतात जात असताना इटणकर नावाच्या व्यक्तीने त्यांना रेशन धान्य दुकानावर झालेल्या वादावरून जीवे मारण्याची धमकी दीली. त्यानंतर सायंकाळी रमेश कदम याने काही गुंडांना सोबत घेऊन गोरखनाथ शेतातून परतत असताना त्यांना अडवले आणि बेदम मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत धारधार चाकुने भोसकले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत गोरखनाथ यांना अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर गोरखनाथ घनगाव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातलगांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. अखेर अप्पर अधीक्षकांनी संतप्त महिलांशी संवाद साधत या प्रकरणातील आरोपींना अटक करु, तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान या घटनेमुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा तातडीने तपास व्हावा अशी मागणी मृत व्यक्ताच्या कुटुंबियांनी केली केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून 11 जणांचा शोध सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी