28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
HomeराजकीयBullet Train : पंतप्रधानांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन 2026साली धावणार; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Bullet Train : पंतप्रधानांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन 2026साली धावणार; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद दौऱ्यात बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्याचे ट्रॅकसाठी 92 खांब तयार करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भारतात बुलेट ट्रेनवरून राजकारण तापलेलं आहे. विशेष म्हणजे मुंबई-अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू व्हावी अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यामुळेच हा पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे वारंवार बोलले जाते. याच कारणाने विशेषत: महाराष्ट्रात भाजप वगळता इतर राजकिय पक्षांनी वेळोवेळी या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जमिन हस्तांतरणाचे काम देखील पूर्ण झाले आहे. अशांतच आता रेल्वे मंत्र्यांनी या विषयात महत्त्वाचे विधान केले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद दौऱ्यात बुलेट ट्रेनबाबत मोठी घोषणा केली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सध्या त्याचे ट्रॅकसाठी 92 खांब तयार करण्यात आले आहेत. जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे. याशिवाय 199 स्थानके जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याअंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

Nashik Fake Currency Notes : नाशिकात ईडलीवाल्या अण्णाचा झोलमाल; तब्बल इतक्या लाखांच्या बनावट नोटा जप्त

Beed News : ‘तुम्हाला रेशनची काय गरज…’ म्हणत ग्रामपंचायत सदस्याचा धारधार शस्त्राने भोसकून खून

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, देशातील सर्व रेल्वे ट्रॅक अजूनही जमिनीवर आहेत. त्यामुळे गुरांचा प्रश्न कायम आहे. तथापि, अशा समस्यांना तोंड देण्यासाठी गाड्या तयार केल्या जात आहेत. कालच्या घटनेनंतरही वंदे भारत ट्रेनला काहीच झाले नाही. पुढचा भाग दुरुस्त केल्यानंतर पुन्हा गाडी सुरू झाली आहे.

बंद भारत एक्सप्रेस पुन्हा रुळावर
मुंबईहून गांधीनगरला जाणारी देशातील पहिली हाय-स्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी अहमदाबादपूर्वी बटवा आणि मणिनगर दरम्यान म्हैस ट्रेनने धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रेनचा पुढील भाग तुटला आहे. आता ही गाडी पूर्णपणे दुरुस्त करून परत आणण्यात आली आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. वंदे भारत एक्सप्रेस सध्या फक्त तीन मार्गांवर धावत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी