31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रNashik Fake Currency Notes : नाशिकात ईडलीवाल्या अण्णाचा झोलमाल; तब्बल इतक्या लाखांच्या...

Nashik Fake Currency Notes : नाशिकात ईडलीवाल्या अण्णाचा झोलमाल; तब्बल इतक्या लाखांच्या बनावट नोटा जप्त

तब्बल ५ लाख ८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि ३ हजार ३०० रुपये रोकड रक्कम आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी भारतनगर येथून त्याला ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणले आहे. एका इडली विक्रेत्या परप्रांतीय व्यक्तीला या प्रकरणी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तब्बल ५ लाख ८ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आणि ३ हजार ३०० रुपये रोकड रक्कम आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी भारतनगर येथून त्याला ताब्यात घेतले आहे. अण्णा उर्फ मलायारसन मदसमय (वय ३३, मूळ कायथर पन्नीकार कुलूम तुदूकुडी, तामिळनाडू) असे या अटक केलेल्या संशयित इडली वाल्याचे आहे. या व्यक्तीवर भारतीय चलनी नोटा नकली तयार करणे आणि त्या नोटा खरे चलन म्हणून बाजारात वापरणे या प्रकरणी प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अण्णाने नवरात्रोत्सवात नाशिकमधील कालिकेच्या यात्रेत बनावट नोटा देऊन काही छोट्या व्यावसायिकांची फसवणूक केल्याच तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडे ५०० रुपयांच्या ४० बनावट नोटा आणि दोन हजार रुपयांच्या २४४ बनावट नोटा आढळल्या. या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा

Beed News : ‘तुम्हाला रेशनची काय गरज…’ म्हणत ग्रामपंचायत सदस्याचा धारधार शस्त्राने भोसकून खून

Mumbai News : डोंबिवलीत रंगलेला ‘मनी हाईस्ट’सारख्या चोरीचा थरार; पोलिसांनी सापळा रचत केली आरोपींना अटक

Weather Change Effects : बदलत्या हवामानात निरोगी राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचे नियमित पालन करा

बनावट नोटा बाजारात आणणारी टोळी नाशिक मध्ये कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळ अधिक तपास करीत आहेत. दरम्यान नाशिक शहरात परप्रांतीय विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. शहरात ठिकठिकाणी इडलीविक्रेत्यांनी बस्तान मांडले असून आता पोलिसांच्या या कारवाईमुळे परप्रांतीय विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या रॅकेटमध्ये कोण कोण सामील आहे आणि हे रॅकेट कुठे कुठे सक्रीय आहे, या इडली विक्रेत्याकडे आणखी काही नोटा आहेत का? आणखी त्याचे कोणी साथीदार आहे का? या बनावट नोटा कुठे तयार करण्यात आल्या याचा सखोल तपास आता पोलिसांकडून चालू आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अशी खात्री करा खऱ्या नोटांची
१) चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र वॉटरमार्कच्या स्वरूपात दिसते.

२) नोटेमध्ये सुरक्षा धागा असतो. यावर पृष्ठभागावर हिंदीमध्ये ‘भारत’ असे तर पार्श्वभागावर ‘आरबीआय’ असे लिहिलेले असते.

३) नोटेच्या डाव्या बाजूला ५०० किंवा १००० अंकाच्या सरळ खाली एक डिझाइन आहे. हे डिझाइनची प्रिंटिंग बनावट नोटांमध्ये थोडीशी हललेली दिसते. म्हणजेच त्यातील फरक लक्षात येऊ शकतो.

४) प्रत्येक नोटेवर मूल्यानुसार ओळखचिन्ह असते. आयत, त्रिकोण, गोल अशा विविध आकारात हे चिन्ह नोटेवर ठळकपणे छापलेले असते.

५) नोटेवरील क्रमांक फ्लुरोसंट शाईने छापलेले असतात.

बनावट नोट म्हणजे काय?
‘सरकारच्या कायदेशीर मान्यतेशिवाय निर्माण केलेली चलनी नोट म्हणजे बनावट नोट. भारतात नोटा छापण्याचा परवाना मध्यवर्ती बँक म्हणून फक्त रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही चलनी नोटा छापण्याचे अधिकार नाहीत. सरकारच्या मान्यतेशिवाय छापलेली नोट चलनात वापरली जाऊ शकत नाही. अशी नोट छापल्यास किंवा तीचा वापर करताना आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा नोंद होऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी