33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयलवकरच ‘शिंदे‘ मुंबईत येण्याची शक्यता

लवकरच ‘शिंदे‘ मुंबईत येण्याची शक्यता

टीम लय भारी

मुंबईः एकनाथ शिंदे मुंबईत येण्याची शक्यता आहे. आजच सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयाने बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला आहे. आज एकनाथ शिंदे राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे गटाने आनंदोत्सव साजरा केला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आज सुप्रिम कोर्टात राज्यात निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर सुनावणी झाली. या पेचप्रसंगावर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. मात्र इतके दिवस वाट पाहणे ‘सत्ता लोभी‘ आमदारांना शक्य होणार नाही. आठवडाभर कुटुंबापासून दूर राहण्याचा बंडखोर आमदारांना कंटाळा आला आहे.

या काळात राज्यपाल विशेष अधिवेशन बोलवू शकतात. तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेनी राज्यपालांची वेळ मागितली असण्याची शक्यता आहे. आता राज्यपाल आणि एकनाथ शिंदेमध्ये कोणती खलबतं होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तर राज्यात उध्दव ठाकरे समर्थक विरुध्द शिंदे गटाचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक भागात झटापट झाली. त्यामुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे.

आता एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर राज्यपाल विधानपरिषदेचे विशेष अधिवेशन बोलावतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुध्दा वाचा:

भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आ. अनिल गोटेek

राज्यपालांनी सरकारला बजावली नोटीस

देशाच्या हवामानात मोठा बिघाड

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी