29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथरावजी शिंदे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी! भास्कर जाधव कडाडले

एकनाथरावजी शिंदे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी! भास्कर जाधव कडाडले

टीम लय भारी 

मुंबई – राज्याचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाचा आजचा (दि.04 जुलै) दुसरा दिवस सुद्धा वादळी ठरला असून अधिवेशनातील भाषणांमुळे अवघे सभागृह दणाणून गेले आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सुद्धा यावेळी आपले मत व्यक्त करून “एकनाथरावजी शिंदे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी” असे म्हणून एक भावनिक साद घातली आहे.

काॅंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे सभागृहातील भाषण संपताच शिवसेना नेते भास्कर जाधव भाषणासाठी उभे राहिले. वेगवेगळ्या मुद्यांना स्पर्श करीत संपुर्ण प्राधान्याक्रम शिवसेनेला देत त्यांनी यावेळी जोरदार फटकेबाजी केली. ‘आम्ही शिवसैनिक’ म्हणवणाऱ्या बंडखोर नेत्यांना शाब्दिक चिमटे काढत शिवसेनेशी गद्दारी केल्यामुळे त्यांनी चांगलेच सुनावले,तर मुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने आठवण करून दिली.

भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत फार कमी वेळा भेट झाली आहे. संकटकाळी कायम धावून जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेत आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे, असे म्हणून जाधव यांनी शिंदे यांना नव्या जबाबदारीची आठवण करून दिली.

शिवसेनेशी असलेले नाते उलगडताना भास्कर जाधव शिंदे गटाला म्हणाले, कोणकोणाच्या विरोधात लढणार, कोण कोणाला घायाळ करणार हे लक्षात घ्या.शेवटी ही लढाई कधी थांबवायची हे एका उत्तम नेत्याला माहित असते असे सांगून जाधव यांनी महाभारत, पानिपत लढाईचे उदाहरण देच भाऊबंदकीच्या लढाईचे चित्र त्यांनी यावेळी रेखाटले.

दरम्यान, कोरोना काळातील मविआ सरकारचे उत्तम काम, नव्या जबाबदारीची जाणीव, हनुमान चालीसा, भोंगा, हिंदुत्व, ईडी कारवाई, शिवसेनेला संपवण्याचा मुद्दामून आखलेला कट, भाजपचा एककलमी कार्यक्रम अशा अनेक मुद्यांवर भाष्य करत शिंदे गटावर जाधव यांनी जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा…

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

बहुमत चाचणीत महाविकास आघाडी तीन आकडी संख्येच्या आत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी