28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमाझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम लय भारी 

मुंबई : राज्यात भाजप शिंदे युतीचे नवे सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये “मी पुन्हा येणार…’ असे वारंवार सांगणारे देवेंद्र फडणवीस अखेर पुन्हा येत उपमुख्यमंत्रीपदी विराजमान सुद्धा झाले. दरम्यान माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार असे फडणवीस यांनी विरोधकांना निक्षून सांगितले आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बहुमत सिद्धीत विजय मिळाल्यानंतर फडणवीस बोलत होते.

गेल्या अडीच वर्षांपासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येणार… असे म्हणून सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील असताना महाविकास आघाडीचे सरकार आले. दरम्यान गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भाजपशी हात मिळवणी केली त्यामुळे मी पुन्हा येणार…हे फडणवीसांचे ब्रीद सिद्धीस गेले. यावर भाष्य करत “मी पुन्हा आलो आणि इतरांना पण सोबत घेऊन आलो”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या अडीच वर्षांपासून या गोष्टींवरून विरोधकांनी फडणवीस यांची टिंगल सुरू केली होती, याला प्रत्युत्तर देत माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार असे फडणवीस यांनी आजच्या अधिवेशनात विरोधकांना निक्षून सांगितले, त्याला पुढे जोड देत हा बदला म्हणजे सगळ्यांना माफ करणे आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या अनोख्या भूमिकेमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

हे सुद्धा वाचा…

नवं युती सरकार पडणार की पाडणार? राज्यात भविष्यवाण्यांना आला ऊत

‘तुमची लायकी आता फक्त बटण दाबण्यापूर्ती’, निलेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात

मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे बाप-लेकाला डिवचले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी