30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईसभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

सभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

टीम लय भारी

मुंबई : राज्यात विधानसभेचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन (Special Assembly Session) घेण्यात येत आहे. यामध्ये आज (दि. ४ जुलै २०२२) शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपने आपले बहुमत सिद्ध करून राज्यातील सत्तेवर आपला दावा केला. यावेळी सभागृहाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले.

त्यानंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी गोड शब्दात शिंदे सरकारचा समाचार घेतला. बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरु असताना सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप देखील केला. त्यावेळी त्यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृहाला शिस्त लावण्याची जबाबदारी आपली आहे, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांना शांत बसण्यास सांगितले.

‘सुधीरजी आपली वेळ येईल तेव्हा आपण बोला. आता मला बोलुद्यात,’ असे म्हणत थोरात यांनी सुधीर मुनगंटीवार यांना शांत बसवले. ‘तुम्ही अध्यक्ष आहात, त्यामुळे आतापासूनच सभागृहातील सर्वांना शिस्त लावण्यात यावी, हि जबाबदारी तुमची आहे.’ असेही अध्यक्षांना बाळासाहेब थोरातांकडून सांगण्यात आले.

बंड करताना बंदूक आमच्या खांद्यावर ठेवली
राज्यात सुरु असलेल्या या सर्व गोष्टींमध्ये मला एका गोष्टीचे वाईट वाटले. तुम्ही सुरतला गेलात, गुवाहाटीला गेलात, गोव्याला गेलात, कोणी काय म्हंटले. यावर मी आता जात नाही. पण या सगळ्यामधून जात असताना, हे सगळे बदल करत असताना बंदूक मात्र आमच्या खांद्यावर ठेवली. एकत्र काम करत होतो, खुल्या मनाने काम करत होतो त्यामुळे या गोष्टीचे वाईट वाटल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा :

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बहुमत चाचणीत महाविकास आघाडी तीन आकडी संख्येच्या आत

नवं युती सरकार पडणार की पाडणार? राज्यात भविष्यवाण्यांना आला ऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी