इलेक्टोरल बाँड(Electoral Bond ) प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट असल्याचा मोठा आरोप यावेळी त्यांनी केला आहे. तसेच, इलेक्टोरल बॉन्डद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) पक्षाला करोडो रुपये कसे दिलं याच्या चार पद्धती सांगितल्या. निवडणुक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा(Electoral bond ) डेटा सार्वजनिक केला. यामध्ये राजकीय पक्षांना आतापर्यंत या माध्यमातून किती पैसे प्राप्त झाले याबाबतची माहिती जाहिर केल्यापासून विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून केंद्र सरकारने या कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळले आहेत. असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा न्याय काढली आहे. या यात्रेचा रविवारी (ता. १७) मुंबईत समारोप होणार असून शिवाजी पार्क मैदानावर काँग्रेसची जंगी सभा होणार आहे. तत्पुर्वी नाशिक येथून मुंब्रा मार्ग भारत जोडो यात्रा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात येऊ धडकली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेचा भडीमार केला.
…तर 14 हजार कोटी कुठे गेले? इलेक्टोरल बॉण्डवर अमित शहांचा प्रश्न
काय म्हणाले राहुल गांधी?
इलेक्टोरल बाँड (Electoral bond) हे मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे. ईडी-सीबीआय या संस्था तपास करत नाहीत, तर त्या भाजपसाठी वसुलीचं काम करतात. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो.
भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे. असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी PM मोदींनी देशवासीयांना दिली नवी गॅरंटी
तसेच, राहुल गांधी यांनी यावेळी इलेक्टोरल बॉन्डद्वारे PM मोदींनी पक्षाला करोडो रुपये कसे दिलं हेदेखील सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की देशातून भ्रष्टाचार संपवायला हवा. त्यानंतर त्यांनी निवडणूक रोख्यांची संपूर्ण रचना तयार केली. आता असे समोर आले आहे की, भारतातील सर्वात मोठ्या कंपन्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोदीजींच्या पक्षाला करोडो रुपये देता असा आरोप करत राहुल गांधी यांनी चार पद्धती सांगितल्या.
PM मोदी ने कहा था- देश से भ्रष्टाचार मिटाना है।
फिर उन्होंने इलेक्टोरल बॉन्ड का पूरा ढांचा तैयार किया।
अब सामने आया है कि हिन्दुस्तान की सबसे बड़ी कंपनियां इलेक्टोरल बॉन्ड के माध्यम से मोदी जी की पार्टी को करोड़ों रुपए देती हैं।
इसके 4 तरीके हैं-
1. मोदी सरकार कंपनी के… pic.twitter.com/BdV9SGN4bJ
— Congress (@INCIndia) March 16, 2024
- मोदी सरकार ईडी, सीबीआय, आयटी कंपनीच्या मागे लावते.
- ती कंपनी २-३ महिन्यांनी भाजपला देणगी देताच तपास यंत्रणा माघार घेतात.
- भाजपला देणग्या देणाऱ्या कंपन्यांनाच मोठी कंत्राटे दिली जातात.
- आधी कंपनीला कंत्राट दिले जाते, नंतर त्याचा थेट फायदा मोदीजींच्या पक्षाला होतो.
- शेल कंपन्यांच्या माध्यमातून भाजपचा स्वतःचा पैसा भाजपच्या हाती लागला आहे.