31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरराजकीयशिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या प्रयोगाने महाविकास आघाडीत तिढा !

शिवशक्ती-भीमशक्तीच्या नव्या प्रयोगाने महाविकास आघाडीत तिढा !

शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून उद्धव ठाकरे हे त्यांच्या फूट पडलेल्या पक्षाला मजबूत आणि बलाढ्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून आगामी निवडणुकांमध्ये ते शिंदे-भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीला आव्हान देऊ शकतील. याच पार्श्वभूमीवर सोमवारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर आगामी निवडणुकीसाठी शिंदे-भाजप आणि मनसे यांच्यात संभाव्य युती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली. ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून करण्यात आला, मात्र रविवारी रात्रीच याची माहिती प्रसारामध्येमांच्या हाती लागली. त्यामुळे अखेरच्या क्षणी बैठकीचे ठिकाणही बदलण्यात आले. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर या दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी प्रयत्न केला. परंतु या दोन्ही नेत्यांनी याबाबत बोलण्यास आणि प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या या भेटीनंतर राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा महत्वाचे बदल घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधन ठाकरे यांच्यातही विचार विनिमय होत असे, असे राजकीय जाणकार सांगतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोघांच्या वारसांना एकमेकांची गरज आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ (Shiv Shakti-Bhim Shakti) एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांच्याकडून हा प्रयत्न झाला होता, मात्र आठवले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते दार बंद झाले आहे. अशा परिस्थितीत आंबेडकर आणि ठाकरे यांच्या तिसर्‍या पिढीने एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. असो, यावेळी दोघांनाही एकमेकांची खूप गरज आहे, हे मात्र वारंवार दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडी; प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन उद्धव ठाकरे देवगिरी बंगल्याकडे रवाना

‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित; सोमनाथ वाघमारे, पा. रंजीत यांची कलाकृती

शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची; सुनावणी आता पुढल्या वर्षीच !

आव्हानाला सामोरे जाण्याचा विचार !
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासमोर पुन्हा राजकीय सत्ता मिळवण्याचे खडतर आव्हान आहे. त्याचवेळी प्रकाश आंबेडकर यांना त्यांच्या राजकीय पाठिंब्याचे रूपांतर निवडणुकीतील यशात करायचे आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय अत्यावश्यकतेबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत या महापालिका निवडणुका एकत्र कशा लढायच्या ? यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरेंसोबत वंचित बहुजन आघाडी आल्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय असेल आणि त्यांना विश्वासात कसं घ्यायचं यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचे काय होणार?
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय झाल्यास जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल आणि वंचित विकास आघाडीशी युती होणार का ? याबाबत देखील बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर महत्वाची बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात नाही तर थेट महाविकास आघाडी यांच्याशी हातमिळवणी करू शकतात. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष आहे. परंतु वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या विरोधात असल्याचे दिसून आलेले आहेत. त्यामुळे जर भविष्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर महाविकास आघाडीमधील सूत्रे यामुळे बदलतात की आहे तशीच राहतात हे पाहावे लागणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!