27 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमनोरंजनBollywood Updates : एकता आणि रिया कपूर यांच्या आगामी 'द क्रू'साठी तब्बू,...

Bollywood Updates : एकता आणि रिया कपूर यांच्या आगामी ‘द क्रू’साठी तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन एकत्र

तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर 'लीडिंग लेडीज' कॉमिक कॅपर 'द क्रू'साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनन यांनी त्यांच्या अभिनयाने आणि मनोरंजक चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन नेहमीच जिंकले आहे. आता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या या तीन सुंदर ‘लीडिंग लेडीज’ कॉमिक कॅपर ‘द क्रू’साठी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती ‘वीरे दी वेडिंग’च्या सुपरहिट निर्मात्या जोडी एकता आर कपूर आणि रिया कपूर यांनी केली असून, दर्शकांना ड्रामा आणि कॉमेडीचा डोस देण्यासाठी सज्ज झाले आहेत. संघर्ष करणाऱ्या एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘द क्रू’ एक मजेशीर कॉमेडी असेल. चित्रपटात तीन महिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व काही अतूट प्रयत्न करताना पाहायला मिळतील. परंतु, त्यांच्या नशिबी अनोखी परिस्थिती निर्माण होते आणि ते खोट्याच्या जाळ्यात अडकतात. ‘द क्रू’हा चित्रपट चुका आणि विविध घडामोडींच्या विनोदाने भरपूर आहे.

निर्माती एकता आर कपूर म्हणाल्या, “वीरे दी वेडिंगच्या यशानंतर, बालाजी मोशन पिक्चर्सला रिया कपूरसोबत आणखी एका चित्रपटासाठी काम करण्यास आनंद झाला आहे. तब्बू, क्रिती आणि करीना ‘द क्रू’साठी योग्य असून, हा चित्रपट खूप मनोरंजक आणि विनोदाने भरपूर आहे. ही कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी थांबू शकत नाही.”

हे सुद्धा वाचा

Deepali Sayyad : ‘उद्धवां’ची साथ सोडत दीपाली सय्यद ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’

Sanjay Raut : 101 दिवसांचा वनवास संपला! संजय राऊतांना जामीन मंजूर

Justice DY Chandrachud : सुप्रीम कोर्टाची कमान मराठी माणसाच्या हातात

निर्माती रिया कपूर म्हणाल्या, “माझ्या पुढच्या चित्रपटासाठी या तीन सुंदर, प्रतिभावान कलाकारांना आणणे हे एक स्वप्न आहे. मी उत्साहित आणि दृढनिश्चयी आहे आणि चित्रीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. तसेच, ‘वीरे दी वेडिंग’नंतर मी एकतासोबत दुसऱ्यांदा काम करत आहे आणि ती मला सपोर्ट करत आहे हि माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.”

क्रिती सॅनन म्हणाल्या, “मी नेहमीच सशक्त पात्रे आणि अनोख्या कथांसाठी उत्सुक असते आणि ‘द क्रू’ त्यापैकी एक आहे. तब्बू मॅम आणि करीना या दोन प्रतिभावंतांसोबत काम करताना मला खूप आनंद होत आहे. मी नेहमीच त्यांचे आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे आणि पाहिले आहे. मी तब्बू मॅमला काही प्रसंगी भेटले आहे आणि त्या नेहमीच खूप उत्साही राहिल्या आहेत. बेबो आयकॉनिक आहे, आणि मी त्यांची नेहमीच फॅनगर्ल राहिली आहे. दुसरीकडे, रिया आणि एकता या उत्कृष्ट आणि सशक्त निर्मात्या आहेत ज्यांनी सशक्त आणि प्रगतीशील महिला पात्रांना आणि थीमला समर्थन दिले आहे. मला नेहमीच एक मजेशीर आणि अनोखा महिला चित्रपट करायचा होता आणि या चित्रपटाने माझी हि इच्छा पूर्ण केली असून, मला लगेच स्क्रिप्ट आवडली. हा प्रवास सुरू करण्यासाठी मी प्रतीक्षा करू शकत नाही.

याबाबत बोलताना करीना कपूर म्हणाल्या, “‘वीरे दी वेडिंग’चे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. रिया आणि एकतासोबत काम करण्याचा हा एक छान प्रवास होता. त्यामुळे जेव्हा रिया तिचा नवीन प्रोजेक्ट ‘द क्रू’ घेऊन माझ्याकडे आली तेव्हा मला खूप उत्सुकता होती. याचा अर्थ असा आहे की मला तब्बू आणि क्रिती या दोन उत्कृष्ट कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्याची संधी मिळत आहे. मी हा प्रोजेक्ट सुरू करण्यास उत्सुक आहे.

यावर पुढे बोलताना तब्बू म्हणाल्या, “या चित्रपटात निर्माता आणि दिग्दर्शक राजेश कृष्णन यांच्यासोबतच करीना आणि क्रिती या दोन सुंदर आणि प्रतिभावान महिला तसेच, रिया आणि एकता या दोन महिलांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. वेडेपणा, आनंद, पात्रांच्या चढ-उतारांसह, हि एक रोलर कोस्टर असणार आहे आणि मी त्यावर स्वार होण्याची वाट पाहत आहे.

राजेश कृष्णन दिग्दर्शित आणि बालाजी मोशन पिक्चर्स लिमिटेड आणि अनिल कपूर प्रॉडक्शन द्वारे सह-निर्मित, हा चित्रपट फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!