31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रBeed Fraud News : संतापजनक! मयत व्यक्तीच्या खात्यातील पैसे बँकेने हडपले

Beed Fraud News : संतापजनक! मयत व्यक्तीच्या खात्यातील पैसे बँकेने हडपले

मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी ठेवलेली रक्कम बॅंक कर्मचाऱ्यांनीच पळवल्याचे लक्षात येताच परिमाळा यांनी अखेर पोलिसात धाव घेतली असून बँक कर्मचारी आणि संबंधित घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे संपुर्ण प्रकरण जटील बनल्यामुळे आता परिमाळा न्याय कधी मिळणार या अपक्षेने वाट पाहत आहेत. 

बीड जिल्ह्यात फसवणुकीसंदर्भातील एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मयत व्यक्तीच्या खात्यातील पैसे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी हडपून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना वेठीस धरल्याचे समोर आले आहे. या फसवणूकीच्या प्रकारामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांनी मयत व्यक्तीच्या खात्यातील पैशाचा अपहार केला आणि याबाबत कोणालाच भनक लागू न देता त्यांच्या पत्नीस ते केवळ दरवेळी कारणं सांगत राहिले, मात्र तरीही न हारता त्या मयत व्यक्तीच्या पत्नीने वकीलामार्फत पतीच्या नावाचे बँक स्टेटमेंट मिळवले आणि रक्कम नेमकी कुठे गहाळ झाली याचा छडाच त्यांनी लावला.

हाती आलेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा मध्यवर्ती अंबाजोगाई शाखेत फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील भाऊसाहेब दामू चामनर यांचे बीड जिल्हा मध्यवर्ती अंबाजोगाई शाखेत खाते आहे. 000411002011470 असा त्यांचा खाते नंबर असून या खात्यात त्यांच्या मुलीचे शिक्षण आणि लग्न याचा आधीच विचार करून काही रक्कम खात्यात सेविंग म्हणून ठेवली होती, परंतु त्या दरम्यान भाऊसाहेब चामनर यांनी 16 मार्च 2016 रोजी जगाचा निरोप घेतला.

हे सुद्धा वाचा…

Yakub Memon : याकूब मेमन प्रकरणावरून कॉंग्रेसचा भाजपवर जबराट पलटवार !

याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण वाईटच, पण नथूराम गोडसे….

Inspirational Story: ऑक्सफर्ड मधून पासआउट झालेल्या मराठमोठया तरूणीने शेयर केला आजोबांचा प्रेरणादायी प्रवास

भाऊसाहेब चामनर यांचे आकस्मित निधन झाल्याने त्यांच्या पत्नी परिमाळा यांना याचा धक्का बसला. घरची सगळीच जबाबदारी परिमाळा यांच्यावर येऊन कोसळली परंतु तरीही न डगमगता परिमाळा यांनी स्वतःला सावरले. त्यावेळी त्यांनी पतीच्या नावे जमा असलेल्या रकमेची बॅंकेत चौकशी केली. सुरवातीला बऱ्याचदा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तोंडी मागणी केली, लेखी अर्ज करून सुद्धा बॅंक कर्मचाऱ्यांनी कोणतीच मदत केली नाही. यानंतर त्यांनी माहिती अधिकारामार्फत ही सदर माहिती मागवली परंतु बॅंकेचे कर्मचाऱ्यांनी तिथे सुद्धा आडमुठेपणा सुरूच ठेवला.

या सगळ्या प्रकारानंतर परिमाळा यांना मनस्ताप व्हायला लागला तरी त्यावर कोणता पर्याय सूचत नव्हता. त्यानंतर थेट त्यांनी एका वकिलाची मदत घेत पतीच्या नावे बँक स्टेटमेंट मिळविले आणि त्यावेळी त्यांनी जबर धक्का बसला कारण त्या खात्यात कुठलीच रक्कम शिल्लक नव्हती. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी ठेवलेली रक्कम बॅंक कर्मचाऱ्यांनीच पळवल्याचे लक्षात येताच परिमाळा यांनी अखेर पोलिसात धाव घेतली असून बँक कर्मचारी आणि संबंधित घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हे संपुर्ण प्रकरण जटील बनल्यामुळे आता परिमाळा न्याय कधी मिळणार या अपक्षेने वाट पाहत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी