33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनबॉलीवूडचा भाईजानला जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

बॉलीवूडचा भाईजानला जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

दबंग अभिनेता सलमान खानला (Salman Khan) जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धाकडराम बिष्णोई नावाच्या एका 21 वर्षांच्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाने राजस्थान येथून अटक केली. तसेच त्याने सलमानप्रमाणे पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला यांच्या वडिलांनाही मेलद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

सलमान खान यांचे मित्र असलेले प्रशांत गुंजाळकर यांना सदरील जिवे मारण्याची धमकी देणारा मेल आला होता. हा मेल रोहित गर्ग नावाच्या एका व्यक्तीने पाठविला होता. या मेलवरून संबंधित व्यक्तीने सलमानला अप्रत्यक्षपणे जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे प्रशांत यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रोहित गर्ग, गोल्डीभाई आणि लॉरेन्स बिष्णोई यांच्याविरुद्ध कट रचून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. दुसरीकडे या मेलबाबत सायबर सेलकडूनही तपास सुरु केला होता. तपासादरम्यान हा मेल राजस्थानच्या जौधपूर शहरातून आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाकडराम बिष्णोई या २१ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सलमानसह सिद्ध मुसेवाला यांच्या वडिलांना मेलद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याची कबुली दिली. (Dhakadaram Bishnoi arrested for threatening to kill Salman Khan)

नेमकं प्रकरण काय? 

सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला 18 मार्च रोजी धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला. यावरून सलमानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सलमानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिलं की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं म्हटलं होतं.

हे सुद्धा वाचा :

बॉलीवूडच्या भाईजानला जीवे मारण्याची धमकी; गँगस्टर गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्नोईचा धमकीच्या ई-मेलमध्ये उल्लेख

टायगर 3च्या सेटवरील सल्मान खानचे अनसिन फोटो व्हायरल, पाहा एक झलक

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी