27 C
Mumbai
Tuesday, February 27, 2024
Homeराजकीयपालिका बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईस टाळाटाळ करतेय; प्रदीप नाईकांचा आरोप

पालिका बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईस टाळाटाळ करतेय; प्रदीप नाईकांचा आरोप

आपले सरकार नेहमी गोरगरीबांनी पोटपाण्यासाठी उभारलेल्या टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्याबाबत तत्पर असते. मात्र गगनभेदी अशा खडाजंग अनधिकृत इमारतींचे बांधकाम करून व्यवसाय करणाऱ्या बिल्डरवर कोणतीही कारवाई का करण्यात येत नाही, असा सवाल विचारत प्रदीप नाईक (Pradeep Naik) यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Pimpri Chinchwad avoiding unauthorized constructions)

महापालिकेचे प्रशासन बिल्डर मंडळींकडून करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ का करीत आहे, असा सवाल देखील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे. महापालिकेच्या या दुटप्पी आणि बिल्डरधार्जिण्या भूमिकेच्या निषेधार्थ संबंधित अनधिकृत बांधकामासमोर तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही नाईक यांनी दिला आहे.

यासंदर्भात नाईक यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुनावळेतील सावता माळी मंदिराजवळील जमीन क्रमांक 40/1, 40/2/1अ आणि 40 /2/2अ मिळकतीमध्ये पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकादेशीररित्या अनाधिकृतपणे बांधकाम केले आहे. हे तत्काळ बांधकाम पाडून टाकावे अशी मागणी एका जागरुक नागरिकाने पालिकेकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने संबंधित अनधिकृत बांधकामाकडे केलेले दुर्लक्ष संशयास्पद आहे, असा आरोप नाईक यांनी केला आहे. एक जागरुक नागरिकाने महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांना निवेदन देखील दिले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. त्याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. पालिका बांधकाम परवाना विभागातील बीट निरीक्षक, वरिष्ठ अधिकारी यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामे जोरात सुरु आहेत. याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अनधिकृत बांधकाम झाल्यावर त्यावर कारवाईसाठी करदात्यांच्या पैशांचा अपव्यय केला जातो. त्यामुळे सुरुवातीलाच अनाधिकृत बांधकाम होवू नये, याची खबरदारी प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. पण, तसे होताना दिसत नाही, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे, असे नाईक यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा:

अंनिस अंधश्रद्धा नाही तर हिंदूधर्म मिटवण्याच्या मागे; प्रदीप नाईकांचा खळबळजनक आरोप

खरे तर भ्रष्ट वर्तणुकीसाठी या ४० आमदारांना आत टाकलं पाहिजे

VIDEO : पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी