28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीय'देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीत वाढ'

‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून गुन्हेगारीत वाढ’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि बारामती खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे राज्याचे गृहमंत्री (Home Minister) आहेत. ते जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हापासून राज्यामध्ये गुन्हेगारी वाढू लागली असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya sule)  म्हणाल्या आहेत. महाराष्ट्रातील पोलिसांच्या सातत्याने बदल्या करण्यात येत आहेत. यामुळे पारदर्शक काम करू दिलं जात नसल्याचं त्या म्हणाल्या आहेत. १५ दिवसांआधी केंद्रसरकारने गुन्हेविषयक विधेयक मांडलं. या विधेयकामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलं, असा दावा सुप्रिया सुळे यानी केला आहे. ज्यात फोन टॅपिंग अधिकृत करण्यात आली आहे.

सध्या राज्यामध्ये आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यावर देखील सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय भूमिकेवर सांगितलं आहे. त्या बोलत असताना वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबतचा मुद्दा हा सर्वाधिक गाजत आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रकाश आंबेडकरांबाबत वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या समाजकारणामध्ये आंबेडकर कुटुंबीयांनी मोठं योगदान दिलं आहे.  संविधान आणि देश वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची गरज नव्या पिढीला आहे. यासाठी आता त्यांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावं. इंडिया आघाडीमध्ये त्यांचा मोठा रोल असणार आहे, असा मला विश्वास आहे, तसेच संविधानासाठी आणि देशाच्या संविधानासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा

कपील शर्माला हार्ट अटॅक वाले पराठे खाऊ घातल्याने दुकानदाराला पडलं महागात

राम मंदिराचा विरोध करणाऱ्या इक्बाल अंसारींची मोदींवर फुलांची उधळण

विक्रोळीत महात्मा ज्योतिबा फुले रूग्णालयाचा पुनर्विकास टांगणीला

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

लोकसभा निवडणुकाच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत फॉर्म्युला ठरला आहे, मात्र शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. आमचा फॉर्म्युला हा दिल्लीत असताना ठरला आहे. महाविकास आघाडी यावर आता जागावटपाबाबत निर्णय घेणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्यात येत आहेत, यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

ट्रीपल इंजिन सरकार गप्प का?

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत. गुंतवणूक होत नाही. हा महाराष्ट्रावर होणार अन्याय असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तरीही ट्रीपल इंजिन सरकार गप्प का? म्हणत सवाल केला. तसेच खोके सरकारकडे २०० आमदार आहेत महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायावर कोणीही बोलत नाहीत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचा बॅड वाजवला आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी