32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजन'भगवा या लाल,जय या सलाम'... 'जेएनयू' चा टीझर झाला प्रदर्शित

‘भगवा या लाल,जय या सलाम’… ‘जेएनयू’ चा टीझर झाला प्रदर्शित

महाकाल मूव्हीज निर्मित जेएनयू चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या आधी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालं होता. या पोस्टरमध्ये भारताचा नकाशा दाखवण्यात आला होता. तेव्हापासूनचा हा चित्रपट चर्चेत आहे. मात्र आता टीझर रिलीज झाल्यानंतर सर्वांच लक्ष या चित्रपटातील डायलॉग कडे आहे.

महाकाल मूव्हीज निर्मित जेएनयू चित्रपटाचा टीझर (JNU Teaser released) प्रदर्शित झाला आहे. याआधी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालं होता. या पोस्टरमध्ये भारताचा नकाशा दाखवण्यात आला होता. तेव्हापासूनचा हा चित्रपट चर्चेत आहे. मात्र आता टीझर रिलीज झाल्यानंतर सर्वांच लक्ष या चित्रपटातील डायलॉगकडे आहे. (JNU Teaser released)

‘चला हवा येऊ द्या’ संपल्यानांतर भावुक झाला कुशल बद्रिके, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…

जेएनयू हा चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विनय शर्मा ‘जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी’ या चित्रपटामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चेहरा दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून सोशल मीडियावर या चित्रपटाचे कौतुक होत आहे. जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (जेएनयू) ह्या चित्रपटात मानवीय असंतोषाची तीव्र शक्ती आणि मानवी विचारांमधील विरोधाभास  दिसून येत आहे.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, या युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थी वर्गापेक्षा जास्त बातम्यांमध्ये असतात. या चित्रपटात निवडणुकीदरम्यान युनिव्हर्सिटीमधील वातावरण देखील या दाखवण्यात आलं आहे. “पाकिस्तान का वीजा मिलना आसान है पर जेएनयू का मिलना मुश्किल”, या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा , रवी किशन , विजय राज , रश्मी देसाई , अतुल पांडे  , सोनाली सहगल यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

या चित्रपटातील मुख्य कलाकार सिद्धार्थनं जेएनयूचा टीझर सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी या टिझर कॅप्शनमध्ये लिहिलं,”जेएनयूमध्ये ज्याचं सरकार असेल, तोच देशाचे भविष्य ठरवेल. या निवडणुकीच्या मोसमात विचारधारेचा संघर्ष पाहा!भगवा या लाल,जय या सलाम”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी