31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; "घड्याळ हेच चिन्ह...'

अजित पवारांच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; “घड्याळ हेच चिन्ह…’

लोकसभा निवडणुकींपूर्वी (Lok sabha election) अजित पवारांच्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तसेच, घड्याळ चिन्हामुळे मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे ते गोठवा ही शरद पवार(Sharad Pawar) गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटासाठी घड्याळ हेच चिन्ह राहणार तसेच, निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे दिलेलं चिन्ह अधिकृत चिन्ह म्हणून तोपर्यंत मान्य करावं असेही निर्देश न्यायालयाने दिलेत.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या निकालाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

‘मलाही या ग्रेट-भेटीचा…’, दिल्ली दौऱ्यानंतर अमित ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवारांच्या गटाला निर्देश

“अजित पवार गटाने इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमध्ये नोटीस जारी करावी आणि प्रचाराच्या सर्व जाहिरातींमध्ये असे नमूद करावं की, त्यांना निवडणूक आयोगाने दिलेलं ‘घड्याळ’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षनाव याबाबतचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे,” असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून घड्याळ हे पक्षचिन्ह त्यांच्यासोबत होतं. मात्र आता ते निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्याने मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अजित पवार गटाने दुसऱ्या चिन्हाचा वापर करावा, अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती.

सिल्व्हर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी….अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

याबाबत झालेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबतची नोटीस सार्वजनिक करण्याचे आदेश अजित पवारांच्या पक्षाला दिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी