29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्र'मलाही या ग्रेट-भेटीचा...', दिल्ली दौऱ्यानंतर अमित ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

‘मलाही या ग्रेट-भेटीचा…’, दिल्ली दौऱ्यानंतर अमित ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह त्यांचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पिता पुत्रांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची भेट घेतली. याच भेटीचा फोटो शेअर करत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं! असं विधान अमित ठाकरे यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह त्यांचे पुत्र अमित ठाकरे(Amit Thackeray) हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पिता पुत्रांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांची भेट घेतली. याच भेटीचा फोटो शेअर करत अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं! असं विधान अमित ठाकरे यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.( Amit Thackeray facebook post On Mns Chief Raj Thackeray And Amit Shah Meet)

राज्यातील महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभागी व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरेंनी गृहमंत्री शहांची भेट घेतली. यावेळी शाह यांच्यासोबत बैठक पार पडलीय. पण बैठकीत नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सिल्व्हर ओकच्या तुकड्यांवर जगणाऱ्यांनी….अंबादास दानवेंवर मनसेचा पलटवार

दरम्यान अमित ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल अकाऊंट्सवर भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोलो ठाकरेंनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह साहेब यांची भेट घेतली. मलाही या ग्रेट-भेटीचा साक्षीदार होता आलं! अशा आशयाची कॅप्शन अमित ठाकरे यांनी दिली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ मनसेसाठी सोडला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी मनसेचा दक्षिण मुंबईतील उमेदवार कोण असणार, याची चर्चा रंगलीय. राज ठाकरे यांचे विश्वासू असलेले बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळू शकते. याशिवाय, शिंदे गट आणि भाजपामध्ये या मतदारसंघासाठी रच्चीखेच सुरू असल्याचं दिसून आलं होतं.

PM मोदींना धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळातून बड्या नेत्याचा राजीनामा

दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा तसंच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे इच्छुक असून, शिंदे गटाकडून नुकतीच राज्यसभेची उमेदवारी मिळालेले मिलिंद देवरा हेदेखील इच्छुक आहेत.

दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये मलबार हिल, वरळी असा उच्चभ्रू परिसर येतो, तर दुसरीकडं सर्वसामान्य लोकांचा वावर असलेला लालबाग, शिवडी हा परिसरही याच मतदारसंघात येतो. त्यामुळं दोन्ही कॅटेगरीचे लोक येथे राहत असून, त्याचा फायदा हा भाजपा, शिवसेना की मनसे यांच्यातील कोणाला होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी