29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयफडणवीसांचा अधिक विचार नाही पण आम्ही...; बच्चू कडूंचं मोठं विधान

फडणवीसांचा अधिक विचार नाही पण आम्ही…; बच्चू कडूंचं मोठं विधान

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा सुरु झाली आहे. अमरावती लोकसभा स्वतंत्र लढणार असल्याची माहिती बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. त्यांच्या या माहितीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. तर बच्‍चू कडू (Bachchu Kadu) यांची ही खेळी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोललं जात आहे. (Bacchu Kadu On Amravati Political Strategy Mahayuti Lok Sabha Election)

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची चर्चा सुरु झाली आहे. अमरावती लोकसभा स्वतंत्र लढणार असल्याची माहिती बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिली आहे. त्यांच्या या माहितीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. तर बच्‍चू कडू (Bachchu Kadu) यांची ही खेळी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोललं जात आहे. (Bachchu Kadu On Amravati Political Strategy Mahayuti Lok Sabha Election)

काय म्हणाले बच्चू कडू?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमरावती लोकसभेसाठी आम्ही उमेदवार देणार आहेत. आम्हाला उत्तम उमेदवार मिळाला आहे. हा उमेदवार भाजपमधला असून आम्ही ६ तारखेला अर्ज भरणार आहे आणि त्याच दिवशी उमेदवाराचे नावदेखील जाहिर करण्यात येईल.

विजय शिवतारेंचा निर्णय पक्का, ‘या’ दिवशी भरणार फॉर्म; बारामती लोकसभा अपक्ष लढवणार?

तसेच, आम्हाला अतिशय ताकदीचा उमेदवार मिळाला असून तो एक लाखांच्या वर मतांनी निवडून येणार असा विश्वासही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला. या भूमिकेनंतर बच्चू कडूंना महायुतीबरोबरच आहात का? तुम्ही घेतलेला निर्णय महायुतीतील नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना मान्य होईल का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

हा आम्ही महायुतीसोबत आहोत. पण अमरावती लोकसभा स्वतंत्र लढणार आणि हा निर्णय महायुतीला पटेल की नाही पटेल माहिती नाही. आम्ही त्यांचा काही जास्त विचार करत नाही. पण आमचा उमेदवार राहिल. आमची मैत्रिपूर्ण लढत असेल असही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

यासोबतच, आमच्या कार्यकर्त्यांची काही नाराजी आहे, मतदारसंघात ताकद असूनही विचारले जात नाही. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

ठरलं, प्रकाश आंबेडकर ‘या’ मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार, मविआला अल्टिमेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बच्चू कडू महायुतीसोबत आले होते. शिंदे यांच्यासोबत ते गुवाहाटी येथे देखील गेले होते. मात्र, मंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी अमरावतीमध्ये महायुतीच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा या उभ्या राहणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच बच्चू कडू नाराज झाल्याचे बोललं जात आहे. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये राजकीय वाद असल्याने बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या उमेदवारीला सुरूवातीपासूनच विरोध केल्याचं दिसून येतंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी