31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनबाकी माजुरडे कलाकार कर्माने मरणार : अभिनेते किरण माने

बाकी माजुरडे कलाकार कर्माने मरणार : अभिनेते किरण माने

टीम लय भारी 

मुंबई: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. माने फेसबुकवर एक विशिष्ठ राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. Kiran Mane FB post is viral

यानंतर मरठी सिनेसृष्टीत गदारोळ सुरु झाला होता. या प्रकरणानंतर अवघ्या तीन ते चार महिन्यात ही मालिका बंद होणार आहे, ही बातमी समजताच त्यांनी यावर किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकच्या माध्यातून प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने (Kiran Mane) आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात की,प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो… मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्राॅडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला.

कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली !!!

जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्‍याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्‍या ‘स्पेशल प्राईम टाईम’ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात ‘पोएटिक जस्टिस’.

ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. ‘खरा न्याय’ सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो.

लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. “ये पब्लीक है ये सब जानती है” असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय.

कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय.

सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही ‘बिकाऊ’ कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.

कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे !

यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पाॅटबाॅय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्‍हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार.

जिथं फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी.

बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस ‘स्पेशल’ बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो !

तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्‍हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

हे सुध्दा वाचा: 

मोदी सरकार के खिलाफ बोलना इस एक्टर को पड़ा महंगा, चैनल ने किय .. 

अभिनेता किरण मानेंची भावूक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

पोलिसांना आदेश देण्याची गरज नाही

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी