30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमनोरंजनमृणालच्या करिअरला चार चाँद; दुबईत झाला मोठा सन्मान

मृणालच्या करिअरला चार चाँद; दुबईत झाला मोठा सन्मान

मराठमोळ्या  मृणाल ठाकूरला सध्या भलतीच खुश आहे. आपल्या तेलुगु चित्रपटाच्या पदार्पणातच मृणालला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. दुबईत पार पडलेल्या ‘सिमा’ (दक्षिणात्य चित्रपट पुरस्कार सोहळा) कार्यक्रमात मृणालला ‘सीता रामम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पदार्पणातच मृणालनं थेट पुरस्कार मिळवल्यानं तिला आता तेलुगुसह इतर दक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स वाढतील, अशी आशा नेटीझन्सनं व्यक्त केली.

शुक्रवारी दुबईत ‘सिमा’ पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला मळ्याली, कन्नडा, तेलुगु आणि तामिळ भाषिक चित्रपट सृष्टीतील नामवंतांनी हजेरी लावली. अभिनेत्री मृणाल ठाकूरनं हिंदी सिनेमात ‘लव्ह सोनिया’ चित्रपटातून पदार्पण केलं. वेश्या व्यवसायावर आधारलेल्या या सिनेमाला जगभरातील चित्रपट फेस्टिवलमध्ये सन्मानित करण्यात आलं. हिंदी मालिका, मराठी सिनेमा केल्यानंतर मृणालला अनेक वर्षांनी बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला होता. आपल्या अभिनयची चुणूक दाखवूनही मृणालला हिंदी चित्रपटात फारसं यश लाभलं नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by SIIMA (@siimawards)

 

अखेरीस मृणालनं तेलुगु चित्रपटाकडे आपला मोर्चा वळवला. तेलुगु भाषा परिचयाची नसल्यानं मृणाल सेटवर येण्याअगोदरच संवाद तोंडपाठ करून यायची. कामासाठी मृणालचा प्रामाणिकपणा पाहून अभिनेता दिलकीरनंही कौतुक केलं. प्रेम कहाणीवर आधारलेल्या ‘सीता रामम’ चित्रपटाला घवघवीत यश मिळालं. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमानंतर मृणालचं करियर बहरलं. सिमा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ पदार्पण आणि सर्वोत्कृष्ठ क्रिटिक अभिनेत्री पुरस्कारावर मृणालनं बाजी मारली.

हे ही वाचा

ठरलं तर… ‘या’ दिवशी होणार शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट प्रदर्शित!

अक्षय कुमार, ट्विंकल खन्नाचा मुलगा झाला 21 वर्षांचा; मुलाबद्दल काय म्हणाले मॉम आणि डॅड ?

मी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा !

मृणाल आता नेनी या तेलुगु चित्रपटात झलकणार आहे. अभिनेता नेनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारतोय. सिनेमाच्या काही भागाचं शूटिंग मुंबईतही पार पडलंय. ‘नेनी’ सिनेमातलं सयायमा गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी