33 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यमहिलांच्या चिडचिड्या स्वभावावर आलयं औषध

महिलांच्या चिडचिड्या स्वभावावर आलयं औषध

बाळंतपणानंतर अनेकदा महिलांचा स्वभाव चिडचचिडा होतो. त्यामुळे अनेक महिलांना मानसिक ताण देखील होत असतो. स्वभावातील चिडचिडेपणा दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करुन देखील त्यांचा चिडचिडेपणा कमी होत नाही. मात्र आता महिलांची ही समस्या दूर होणार आहे. कारण महिलांचा चिडचिडेपणाचा स्वभाव बदलणाऱ्या औषधाचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे.

postpartum irritability म्हणजेच बाळंतपणानंतर स्वभावात येणारा चिडचिडेपणा. आता हा चिडचिडेपणा दूर करण्यासाठी जे औषध निर्माण केले आहे, त्याला अमेरिकेच्या एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने देखील मंजूरी दिली आहे. मात्र ज्या महिला या आजाराने अतिशय ग्रस्त आहेत अशा महिलांनाच हे औषध देण्याची परवानगी असेल. हे औषध 14 दिवस घ्यावे लागणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ बिहेवियरल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस विभागाच्या संचालक डॉक्टर रुशी यांनी या औषधाबाबत माहिती दिली आहे, गर्भवती असताना तसेच बाळंतपणानंतर काही महिलांमध्ये नेराश्य येते. पूर्वी या आजाराकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. अनेक रुग्ण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील टाळत असत. अनेकदा या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये आत्महत्येचा देखील विचार येतो. त्यामुळे अशा महिलांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या मनावरील ताण हलका करण्यासाठी औषध निर्मितीवर संशोधन केले जात होते. आता जुजुर्वे या औषधाने ही समस्या दूर केली आहे.

हे सुद्धा वाचा
मृणालच्या करिअरला चार चाँद; दुबईत झाला मोठा सन्मान
IAS टीना डाबी यांच्या घरात पाळणा हलला; गोंडस बाळाला दिला जन्म
गणेशोत्सव काळात २४ तास रेल्वे सुरू ठेवा : डॉ. जितेंद्र आव्हाड

औषधाचे दुष्परिणाम देखील लक्षात घ्या
अमेरिकेच्या एफडीएने या औषधाबाबत काही दुष्परिणाम सांगितले आहेत. या औषधाची गोळी घेतल्यानंरचे पढचे 12 तास रुग्णाने शाररिक कष्टाची कामे करु नयेत, तसेच वाहन चालविण्याची देखील या रुग्णाला परवानगी नसेल. या औषधाची गोळी घेतल्यानंतर रुग्णाला, चक्कर, थकवा, सर्दी, खोकला, मुत्रसंसर्ग असे काही दुष्परिणाम दिसू शकतात. असे असले तरी औषधाचे दुष्परिणाम दिर्घकाळ नसतील असे देखील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

औषधाबाबत महत्त्वाचे
जुजुर्वे गोळीची चाचणी स्तनदा मातांवर करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत अद्याप सखोल माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे माणसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच हे औषध देणे योग्य ठरेल. मात्र जर डॉक्टर सरसकटपणे या गोळ्या रुग्णांना लिहून देऊ लागल्यास त्याचा आवश्यकतेहून अधिक वापर वाढण्याचा देखील धोका आहे. त्यामुळे नव्या समस्या देखील उद्भवू शकतात, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी