29 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमनोरंजनअक्षय कुमार, ट्विंकल खन्नाचा मुलगा झाला 21 वर्षांचा; मुलाबद्दल काय म्हणाले मॉम...

अक्षय कुमार, ट्विंकल खन्नाचा मुलगा झाला 21 वर्षांचा; मुलाबद्दल काय म्हणाले मॉम आणि डॅड ?

अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव आज २१ वर्षांचा झाला. आपल्या मुलासाठी दोघांनीही इंस्टाग्रामवर वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहिलीआहे. मुलाचं वयात येणं, त्याच्या बदलत्या स्वभावांबद्दल बापाने केलेले कौतुक अक्षयच्या पोस्टमधून झळकत होतं. आरव शिक्षणानिमित्त परदेशात असतो.

अक्षयची पत्नी आणि प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर, अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही प्रसिद्ध इंग्रजी लेखिका आहे. इंग्रजी विषयावर ट्विंकल खन्नाचं भन्नाट प्रभुत्व आहे. ट्विंकलच्या छत्रछायात वाढलेल्या आरवलाही इंग्रजीचं उत्तम ज्ञान आहे. मूळचा पंजाबी असलेल्या अक्षयच्या घरात मात्र इंग्रजी भाषेतच संवाद होत असतो. त्यामुळे अक्षयही त्याला मिश्किलशैलीत अंग्रेजी पुत्तर म्हणतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट लिहिताना अक्षय म्हणतो की, आरव, माझा प्रिय अंग्रेजी पुत्तर… तू आज २१ वर्षांचा झालास. वयानं तू कितीही मोठा झालास तरीही थकलेल्या बापाच्या मांडीवर तू आनंदानं कधीही उडी मारू शकतोस. २१ वर्षांचा झाल्यानं तू आता कायदेशीररित्या तुझ्या मनाप्रमाणे हवं तसं जगू शकतोस. तुझ्या जगण्याच्या निरनिराळ्या कल्पनांबाबत मला कल्पना आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळा, तुझ्यामुळे बाप म्हणून सगळ्यात मला अभिमान आहे, असं अक्षय म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)


दुसरीकडे अभिनेत्री ट्विंकल खन्नानंही आपल्या भावना इंस्टाग्राम वर पोस्ट करत लिहिल्या. आरव सोबतचा बालपणीचा आणि आता तरुण वयातला फोटो पोस्ट करत ट्विंकल म्हणाली की, लहान मुलाला मोठं करणं एखादी इमारत विकत घेत प्रत्येक रूम डिझाईन करण्यासारखं आहे. आता घर हक्काच्या मालकाच्या हाती देण्याची वेळ आली आहे. हा नवा मालक घरातलं फर्निचरही बदलेल आणि घरातील आर्थिक बाजूही सांभाळेल. तुझा चांगला स्वभाव जवळच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य देवो, अशी प्रार्थना ट्विंकलनं आपल्या पोस्टमध्ये केली.

हे सुद्धा वाचा 
गोव्यात फिरायला जाताय; मग हे अॅप डाऊनलोड करा !
औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरणाच्या वाटेतील काटे दूर; आज नोटिफिकेशन निघणार?
मी अम्मा होता, होता राहिले; गिरीजा ओकने सांगितला ‘तो’ किस्सा !

अक्षय आणि ट्विकलला नितारा नावाची लहान मुलगी ही आहे. नितारा आणि आरव मध्ये नऊ वर्षाचं अंतर आहे. अक्षयची दोन्ही मुलं प्रसार माध्यमांपासून लांब राहणं पसंत करतात. आता राजी फोटोग्राफर्समध्ये आरव लाजरा मुलगा म्हणूनच पसंत आहे. एअरपोर्ट किंवा हॉटेल बाहेर फोटोग्राफरला पाहताच आरव स्वतःचा चेहरा लपवतो. आरवला सिनेमा जगतापासून लांब राहणं पसंत असल्याचं अक्षयनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. बॉलीवूडची क्वीन आलिया भट आरवची क्रश असल्याचं सिक्रेटही अक्षयनंच प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी