28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमनोरंजन'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने केले 30 किलो वजन कमी, फोटो...

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने केले 30 किलो वजन कमी, फोटो पाहून व्हाल थक्क

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या आगामी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात तो स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे. यादरम्यान आता रणदीप हुड्डा ने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक लोकांना आश्चर्यचकित करत आहे.

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर'(Swatantrya Veer Savarkar) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, तो प्रेक्षकांना खूप आवडला. या चित्रपटात तो स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अभिनेत्याने अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे. यादरम्यान आता रणदीप हुड्डा ने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक लोकांना आश्चर्यचकित करत आहे. (Randeep Hooda Transformation)

या फोटो मध्ये रणदीप खूप बारीक दिसत आहे. त्याच्या शरीराची हाडे दिसत आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही, याआधी रणदीपने सरबजीतसाठी असेच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. हा चित्रपट 22 मार्चला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

‘भगवा या लाल,जय या सलाम’… ‘जेएनयू’ चा टीझर झाला प्रदर्शित

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी त्याने केलेले परिवर्तन रसिकांना खूप भावत आहे. रणदीपने हे पात्र साकारले नसून ते जगले आहे, हे ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रणदीपने प्रत्येक दृश्यात सावरकरांची झलक उत्तम प्रकारे दाखवली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाचे वजन कसे कमी झाले. या फोटोत रणदीपला ओळखणे कठीण होत आहे. त्याचे हे रूपांतर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याचा हा फोटो शेअर करताना रणदीप हुड्डा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ब्लॅक वॉटर.’ काला पानीच्या शिक्षेदरम्यान सावरकर अत्यंत बारीक झाले होते, हे रणदीपच्या या चित्रावरून दिसते. तशाच प्रकारे रणदीपनेही स्वत:चा कायापालट केला आहे. सध्या रणदीपचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या समर्पणाचे खूप कौतुक करत आहेत.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनपट आहे. ते क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राजकारणी होते. ज्याचे पात्र रणदीप हुड्डा या चित्रपटात साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे शिवाय अमित सियालसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये चित्रपटामध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी