33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्राईमअभिषेक घोसाळकर प्रकरणी काय म्हणाल्या त्यांच्या पत्नी पहा

अभिषेक घोसाळकर प्रकरणी काय म्हणाल्या त्यांच्या पत्नी पहा

माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर हत्याप्रकरणी पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आम्ही हायकोर्टात रिट पिटीशन करणार आहोत. तपासयंत्रणा बदलून द्या,  सीबीआयला द्यायचं की आणखी कोणाकडे द्यायचं हे कोर्ट ठरवेल. मॉरिसला मिश्राने गन दिल्याचं कोर्टाने म्हटलंय.

 

माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर हत्याप्रकरणी पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आम्ही हायकोर्टात रिट पिटीशन करणार आहोत. तपासयंत्रणा बदलून द्या,  सीबीआयला द्यायचं की आणखी कोणाकडे द्यायचं हे कोर्ट ठरवेल. मॉरिसला मिश्राने गन दिल्याचं कोर्टाने म्हटलंय. एकत्र जाऊन गोळ्या खरेदी केल्या असं म्हटलंय. तपास नीट होत नाही. मुख्यमंत्र्याना मुल जाण्याच दु:ख काय हे माहिती आहे. तसेच अभिषेक माझा मुलगा होता त्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं”, असं आवाहन वडील माजी नगरसेवक विनोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषदेत केलं.

PM मोदींना धक्का; केंद्रीय मंत्रिमंडळातून बड्या नेत्याचा राजीनामा

या पत्रकार परिषदेत अभिषेक घोसाळकर यांचे वडील विनोद घोसाळकर, अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह वकीलही होते.

तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, पतीच्या हत्याच्या प्रकरणात योग्यप्रकारे तपास होत नाही,
आमच्यासोबत असलेल्या नगरसेवकांवर दबाव टाकला जातोय. छोट्या-छोट्या गोष्टीवरुण पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरोनाने त्यादिवशी मलाही कार्यक्रमाला बोलावलं होतं. पण उशिर झाल्याने अभिषेक यांनी मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवलं, असा दावा तेजस्वी घोसाळकर यांनी केला.

‘चला हवा येऊ द्या’ संपल्यानांतर भावुक झाला कुशल बद्रिके, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला…

हत्या झाली त्याचा योग्य तपास होत नाहीय. अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारीख यांचा वावर याबाबत आयुक्तांना तपास करण्यासाठी सांगितलं होतं. ५ मार्च रोजी न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले ते महत्त्वाचे आहेत. मॉरिस आणि मिश्रा याने सोबत बुलेट खरेदी केले, ती गन त्याची होती, मोरीसला त्याचा अॅक्सिस होता. आम्ही जमा केलेल्या गोष्टी आणि इतर पुरावे पोलिसांकडे दिलेले आहेत आणि तपासाची मागणी केलेली होती. सीसीटीव्ही दिले होते आणि अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी केलेली होती. मॉरिसला अमरेंद्र मिश्राने गन दिल्याचे स्पष्ट आहे. दोघांणी मिळून बुलेट खरेदी केल्या होत्या. माझ्या दोन मुलांचे भविष्य, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालंय. हायकोर्टाला एवढीच विनंती त्यांनी लवकर याचा निकाल लावावा”,असेही घोसळकर म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी