30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमनोरंजनSushmita Sen : सुष्मिता सेन पुन्हा झाली 'ट्रोल', कारण ऐकून व्हाल थक्क

Sushmita Sen : सुष्मिता सेन पुन्हा झाली ‘ट्रोल’, कारण ऐकून व्हाल थक्क

सुश्मिता सेनचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये सुष्मिता, रोहमन आणि रेने फोटोग्राफर्सना पोझ देत असल्याचे दिसून येत आहे. सुष्मिता, तिचा एक्स बाॅयफ्रेंड आणि मुलगी रेने सांताक्रूझमधील होम डेकोर बुटीकमधून बाहेर पडत असताना काहींना दिसले. त्यामुळे सुष्मितावर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

बाॅलिवूडची गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सुष्मिता सेन तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. सिनेसृष्टीतील प्रत्येकाचे वयक्तिक आयुष्य कसे आहे हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात, त्यात हे दिग्गज कलाकार आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत त्यांच्या वयक्तिक आयुष्यात घडणारे काही क्षण ते पोस्ट करत आपल्या चाहत्यांसोबत आनंद व्यक्त करत असतात. मात्र, सुश्मिता सेनच्या बाबतीत मात्र कौतुक करण्याऐवजी चाहते ट्रोल खूप करत असल्याचे पाहायला मिळते. यावेळी @viralbhayaniने इन्स्टाग्रामवर सुष्मिताचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु या व्हिडिओनंतर अनेकजण कमेंट्सच्या माध्यमातून ट्रोल करीत असल्याचे दिसून येत आहे.

सुश्मिता सेनचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये सुष्मिता, रोहमन आणि रेने फोटोग्राफर्सना पोझ देत असल्याचे दिसून येत आहे. सुष्मिता, तिचा एक्स बाॅयफ्रेंड आणि मुलगी रेने सांताक्रूझमधील होम डेकोर बुटीकमधून बाहेर पडत असताना काहींना दिसले. यामध्ये मुलीने डेनिम पँट आणि गुलाबी रंगाचा टॉप परिधान केला होता, तर सुष्मिता पर्पल कलरच्या कॅज्युअल लूकमध्ये होती. रोहमनने गुलाबी टी-शर्ट आणि राखाडी पँट घातल्याचे यात दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Milk Rate Increases : बाप्पाच्या सणाला ‘महागाई’चे नैवेद्य, दुधाच्या दरात पुन्हा वाढ

Ashtavinayak : लेण्याद्रीचा गिरजात्मक गणेश ‘सहावा’ विनायक

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत गावकऱ्यांचा राडा, तंटामुक्तीचे वाजले तीनतेरा

हा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने काही नेटकऱ्यांनी सुष्मिताला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. या व्हिडिओच्या कमेंट बाॅक्समध्ये सुद्धा दणदण मेसेज आपटायला सुरवात झाली. यामध्ये अनेकांनी ललित मोदींविषयी विचारणा केली आहे. एकाने तर चक्क लिहिले आहे की, ‘ललित भाई हे काय आहे?’, तर त्यावर दुसऱ्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है?, तर आणखी कोणी या प्रेमाला काय नाव द्यायचे?’ असे म्हणून खिल्ली उडवली आहे.

ललित मोदी यांच्याशी लग्न करण्याआधी सुष्मिता सेन रोहमन सोबत डेट करत होती, अनेक वर्षे ते एकत्र सुद्धा राहिले परंतु नंतर काहीतरी बिनसले आणि दोघांचे ब्रेकअप झाले. रोहमन सुष्मितापेक्षा वयाने खूपच लहान असून सुद्धा दोघे डेट करत असल्याने अनेकांनी खूपच सडकून टीका केली होती. त्यानंतर सुष्मिताने ललित मोदी यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न केल्याचे जेव्हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा सुद्धा अनेकांनी पैशांसाठी लग्न केले म्हणून सुष्मिता सेनला ट्रोल केले. दरम्यान ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा सुष्मिता सेन आणि रोहमन एकत्र दिसल्याने आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुष्मिता सेन चर्चेत आली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी