27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमनोरंजनअयोध्येच्या मंदिरात गाणाऱ्या ऋषीने पटकावला 'इंडियन आयडॉल 13'चा किताब

अयोध्येच्या मंदिरात गाणाऱ्या ऋषीने पटकावला ‘इंडियन आयडॉल 13’चा किताब

सोनी वाहिनीवर प्रसारित होणार्‍या इंडियन आयडॉल 13 या शोचा ग्रँड फिनाले काल संपन्न झाला. यंदाचा इंडियन आयडॉल 13 च्या विजेतेपदी अयोध्येत राहणाऱ्या ऋषी सिंग याने बाजी मारली. ऋषी यांना ट्रॉफीसह 25 लाख बक्षीस रक्कम आणि एक आकर्षक नवीन कार बहाल करण्यात आली. या शोमध्ये अनेक दिग्गज स्पर्धकांनी आपल्या आवाजाची जादू संपूर्ण जगावर चालवली.

अयोध्येच्या मंदिरात गाणाऱ्या ऋषीने पटकावला 'इंडियन आयडॉल 13'चा किताब

सोनी वाहिनीवर प्रसारित होणार्‍या इंडियन आयडॉल 13 या शोचा ग्रँड फिनाले काल म्हणजेच 2 एप्रिल रोजी संपन्न झाला. या फिनाले रेसमध्ये 6 फायनलिस्ट होते. ज्यात ऋषी सिंग, शिवम सिंग, बिदिप्ता चक्रवर्ती, चिराग कोतवाल, देबोस्मिता रॉय आणि सोनाक्षीकर यांचा समावेश होता. शोमध्ये अनेक धमाकेदार परफॉर्मन्स होते आणि अनेक पाहुणे कलाकारांनी त्यात सहभाग घेतला. बेस्ट डान्सर 3 चे जज सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस देखील या समारंभासाठी उपस्थित होते. फिनालेमध्ये भारती सिंगनेही तिच्या विनोदी पद्धतीने संपूर्ण समारंभाची धुरा सांभाळली.

इंडियन आयडॉल 13 चा विजेता ठरलेला ऋषी सिंह हा अयोध्येचा रहिवासी आहे. सिंगिंग शोमध्ये येण्यापूर्वी तो मंदिर आणि गुरुद्वारांमध्ये गायचा. विशेषतः यंदाच्या इंडियन आयडॉलमध्ये ऋषीला त्याच्या जादुई आवाजासाठी ओळखले जाते. त्याच्या प्रत्येक गाण्याने श्रोता मंत्रमुग्ध होत असे. दिवसेंदिवस त्याच्या आवाजाने सुर गाठला आणि त्याला ट्रॉफीच्या जवळ आणले. याप्रसंगी ऋषीने त्याच्या भावना व्यक्त केल्या तो म्हणला, ‘मला अजूनही विश्वास बसत नाही की, मी ट्रॉफी जिंकली आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे.’

अयोध्येच्या मंदिरात गाणाऱ्या ऋषीने पटकावला 'इंडियन आयडॉल 13'चा किताब

विजेतेपद बहाल केल्यानंतर ऋषीला 25 लाख रुपयांची बक्षीस रक्कम आणि ट्रॉफीसह एक चमकणारी कार बक्षीस म्हणून देण्यात आले. दरम्यान देबिस्मिता आणि चिराग प्रथम आणि द्वितीय उपविजेते ठरले, त्यांना ट्रॉफीसह 5 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा :

तरूणांनो स्वप्ने पाहा: ऑफिस बॉय ते मेन हीरो; TDM नायकाचा थक्क करणारा प्रवास

अरेच्च्या : २४ तासांसाठी भिकारी बनला ‘हा’ प्रसिद्ध युट्यूबर

रश्मिकाची अस्सल मराठमोळी नृत्य अदाकारी..!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी