33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयकाँग्रेसची 'सेव्ह डेमोक्रसी' कोसळली!

काँग्रेसची ‘सेव्ह डेमोक्रसी’ कोसळली!

छत्तीसगड येथे काँग्रेसच्या ‘सेव्ह डेमोक्रसी’ या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. यावेळी मोठ्या संख्येने नेते मंचावर उपस्थित होते. त्यामुळे या अपघातात काही नेत्यांना देखील दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

काँग्रेसची मशाल रॅली संपल्यानंतर छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काँग्रेस नेते जमलेल्यांना संबोधित करत असतानाच अचानक हा अपघात घडला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये अनेक काँग्रेस नेते स्टेजवर उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी ते मोठमोठ्याने घोषणाही देताना दिसत आहेत. स्टेजवर भरपूर गर्दी झालेली आहे. इतक्यात नेत्यांनी भरलेला स्टेज अचानक कोसळला आणि नेते खाली पडल्याच पाहायला मिळालं.

काँग्रेसच्या (Congress) ‘लोकशाही वाचवा’ या कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. स्टेज कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडालेली दिसुन आली. तिथे उपस्थित लोक ओरडू लागल्याचंही व्हिडिओमध्ये दिसुन येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेमध्ये काही नेते जखमी झाले आहेत.

लोकशाही वाचवा
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यानंतर सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात दोषी ठरवले होते. तसेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. यावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच्याच निषेधार्थ म्हणून काँग्रेसकडून देशभरात लोकशाही वाचवा रॅली काढण्यात आली आहे.

काँग्रेसची 'सेव्ह डेमोक्रसी' कोसळली!

हे सुद्धा वाचा: 

‘मोदी चोर’वरुन शिक्षेविरोधात राहुल गांधी यांचे अपील; सुरत कोर्टात सोमवारी सुनावणी

डरो मत : राहुल गांधी माफी मागणार तर नाहीच, परंतु पेन्शन सुद्धा घेणार नाहीत!

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा ब्लॅक प्रोटेस्ट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी