29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजनMister Mummy Trailer : रितेश-जेनेलिया दोघेही होणार 'आई' ?

Mister Mummy Trailer : रितेश-जेनेलिया दोघेही होणार ‘आई’ ?

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि आदर्श जोडपे आहे. रितेश आणि जेनेलियाचे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. पण नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार, हे जोडपं आता पुन्हा एकदा आई होणार आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे दोघेही चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि आदर्श जोडपे आहे. रितेश आणि जेनेलियाचे २०१२ मध्ये लग्न झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. पण नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार, हे जोडपं आता पुन्हा एकदा आई होणार आहेत. हो, वाचून धक्का बसला ना की, रितेश देशमुख सुद्धा आई कसा काय होणार ? तर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा ‘मिस्टर मम्मी’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामधून अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘तेरे नाल लव हो गया’ नंतर दोघे आता ‘मिस्टर मम्मी’ या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.

आज शनिवारी (ता. 29 ऑक्टोबर) ‘मिस्टर मम्मी’चा फनी ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये संपूर्ण कॉमेडी पाहायला मिळत आहे. शाद अली दिग्दर्शित ‘मिस्टर मम्मी’ हा चित्रपट हास्याने भरलेला आहे जो तुम्हाला हसायला भाग पाडेल.

Mister Mummy Trailer : रितेश-जेनेलिया दोघेही होणार 'आई' ?

‘मिस्टर मम्मी’ ची कथा एका जोडप्याभोवती ( (रितेश आणि जेनेलिया) फिरते. ज्यांची मुलांबद्दल पूर्णपणे भिन्न विचारसरणी आहे आणि दोघेही गर्भवती होतात. अशा परिस्थितीत पुरुष गरोदर राहिल्यास काय होईल ? हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच मजेशीर आहे. चित्रपटात रितेश दि देशमुख या चित्रपटात अमोल या विलक्षण पीटी शिक्षकाची भूमिका साकारत आहे, तर जेनेलिया त्याच्या पत्नी गुग्लूची भूमिका साकारत आहे.

हे सुद्धा वाचा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : शैलेश लोढा यांनी तारक मेहता मालिका का सोडली ?

Star Plus New Serial : स्टार प्लसच्या ‘फालतू’ मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या निहारिका चोक्सीने बीसीसीआयच्या निर्णयाचे केले स्वागत

Producer Kamal Kishore : पत्नीला कारने धडक दिल्याच्या प्रकरणात निर्माते कमल किशोर यांना अटक; आज न्यायालयात होणार सुनावणी

रितेश देशमुख आपल्या समस्या घेऊन डॉक्टर महेश मांजरेकर यांच्यापर्यंत पोहोचतो असे चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवण्यात आले आहे. दरम्यान, दुसरी महिलाही तेथे पोहोचते आणि तिच्या गर्भधारणेशी संबंधित समस्या सांगते. यावर रितेश म्हणतो की, त्यालाही अशाच सर्व समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर महेश त्यांना सांगतो की तू गरोदर आहेस ? यानंतर कथा हळूहळू पुढे जाते आणि रितेश गरोदर होतो.याचवेळी गुग्लू अर्थात जेनेलिया सुद्धा गरोदर दाखविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून या सगळ्यामध्ये भरपूर कॉमेडी पाहायला मिळत आहे.

शाद अली दिग्दर्शित, शिव अनंत आणि शाद अली निर्मित ‘मिस्टर मम्मी’ टी-सीरीज 11 नोव्हेंबरला प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे. नुकतेच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांनीही त्यांच्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘वेड’ या चित्रपटातून जेनेलिया मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर दिग्दर्शक म्हणून रितेशचा हा पहिलाच चित्रपट आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी