28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमनोरंजनसनी लिओनीनेही साजरा केला रक्षाबंधन! पहा, कोणाला बांधली राखी?

सनी लिओनीनेही साजरा केला रक्षाबंधन! पहा, कोणाला बांधली राखी?

बॉलीवूडच्या सिनेतारकांनी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा केला असून अनेकांनी त्यांची छायाचित्रेही सोशल मिडियावर प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये, सनी लिओनि हिनेही आपल्या परिवारसमवेत रक्षाबंधन साजरा करून त्यांची छायाचित्रे सोशल मिडियावर प्रसिद्ध केली आहेत. सनी लिओनीची रक्षाबंधन साजरा करतानाची छायाचित्रे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

या छायाचित्रांमध्ये सनीसह तिचा पती डॅनियल वेबर, मुलगी निशा आणि अशेर व नोआह ही जुळी मुले रक्षाबंधन साजरा करत असल्याचे दिसत आहे. या छायाचित्रात सनीने गुलाबी ड्रेस परिधान केला असून तिचा पाती डॅनीयलनेही भारतीय पोशाख परिधान केल्याचे दिसत आहे. सनीची मुलगी निशा हिने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. सनीची जुळी मुले अशर आणि नोआह ही देखील भारतीय वेशभुषेत दिसत आहेत.

याशिवाय, सनीच्या कुटुंबाशिवाय तिचा मित्रपरिवारही रक्षाबंधनाच्या उत्सवात सहभागी झाल्याचे दिसत आहे. पोस्ट केलेल्या छायाचित्रांखाली “किती सुंदर दिवस आहे! सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!” असा कॅपशन दिला आहे.

सनीने कोणाला बांधली राखी?
सनीने तिचा स्टायलिस्ट आणि प्रोड्यूसर हितेंद्र कंपोपारा याला राखी बांधली आहे. याशिवाय, सनीने तिचा मित्र आणि निर्माता सन्नी रजाणी यलादेखील राखी बांधली आहे. व्यावसायिक कॅलेब फ्रॅंकलिन यालादेखील सनी राखी बांधत असल्याचे सोशल मिडियावरील फोटोंमध्ये दिसत आहे.

हे ही वाचा 

शाहरुख खानच्या जवानचा ट्रेलर रिलीझ; कमल हसन काय म्हणाला ?

बॉलिवूडच्या कलाकारांनीही साजरी केली रक्षाबंधन!

शाहरुखच्या ‘जवान’चा ट्रेलरला अवघ्या काही मिनिटांत लाखो व्ह्यूज

सनीचा जन्म कॅनडात झाला असला तरी ती मुळ भारतीय वंशाची आहे. त्यामुळे, भारतीय सण-उत्सव ती नेहमीच साजरे करत असते, तिने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांवर तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिसाद दिला असून अनेक फॅन्सनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी