35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजन'मुस्लिम ४ लग्न करू शकतात म्हणून 'ते' लोक जळतात का?' UCC वर...

‘मुस्लिम ४ लग्न करू शकतात म्हणून ‘ते’ लोक जळतात का?’ UCC वर जावेद अख्तरचं खोचक विधान

बॉलीवूडचे ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar on UCC) नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ते नेहमी सामाजिक आणि चित्रपट सृष्टीबाबत आपले मत मांडत असतात. नुकतेच त्यांनी समान नागरी संहितावर आपले मत मांडले. यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. समान नागरी संहिताचं समर्थन करताना ते म्हणाले की केवळ कोणाची निंदा करायची म्हणून हे लागू करु नका. तसेच ते पुढे म्हणाले की लोक मुस्लिमांवर जळतात कारण ते चार लग्न करु शकतात. (Javed Akhtar on UCC)

त्यांनी म्हटलं की समान नागरी संहिताच्या नावाची समस्या आहे. तुम्ही राज्यांमध्ये एक एक करून त्याची अंमलबजावणी करत असाल आणि त्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या येत असतील, तर तो समान नागरी संहिता कसा बनला? आणि दुसरे म्हणजे, जर ते लागू केले जात असेल तर ते केवळ मुस्लिम किंवा अल्पसंख्याकांच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, ते संपूर्ण देशात लागू होईल अशा पद्धतीने पाहिले पाहिजे. ते पूर्णपणे केंद्रित आणि तार्किक असावे. तुम्ही कोणताही कायदा आणता असे नाही. यावर आधी सखोल चर्चा व्हायला हवी.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटासाठी रणदीप हुड्डाने केले 30 किलो वजन कमी, फोटो पाहून व्हाल थक्क

जावेद अख्तर पुढे म्हणाले की, ‘जे समान नागरी संहितेचे समर्थन करतात, त्यांना मी विचारू इच्छितो की तुम्ही तुमची अर्धी संपत्ती तुमच्या मुलीला दिली आहे का? दिले नसेल तर गप्प बसा. पूर्णपणे शांत रहा.’

यानंतर जावेद अख्तर मस्करी करतांना म्हणाले, ‘मुसलमानांना चार बायका ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्यांना नाही या गोष्टीचा हिंदूंना हेवा वाटतो का? त्यांना हा अधिकार मिळाला तर त्यांना आनंद होईल. यासाठीच त्यांना समान नागरी कायदा आणायचा आहे का? सरकारी आकडेवारीनुसार ते हे बेकायदेशीरपणे करत असल्याची वस्तुस्थिती आहे.’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी