30 C
Mumbai
Wednesday, May 24, 2023
घरराजकीयकरुणा मुंडे बीडमध्ये धनंजय मुंडेंना देणार चॅलेंज; शिवशक्ती सेना पक्षाची केली स्थापना

करुणा मुंडे बीडमध्ये धनंजय मुंडेंना देणार चॅलेंज; शिवशक्ती सेना पक्षाची केली स्थापना

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडे यांनी स्वतःचा शिवशक्ती सेना नावाचा पक्ष काढला आहे. त्या द्वारे त्यांचा पक्ष बीड जिल्ह्यातील सर्व निवडणुका लढवणार आहे. त्या बाबतची माहिती त्यांनी बुधवारी (दि. 29) रोजी मुंबईत पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सध्या कौटुंबिक वाद सुरू आहे. धनंजय मुंडे हे करुणा यांना पहिली पत्नी मानायला तयार नाहीत. या विरोधात करुणा मुंडे यांची कायदेशीर लढाई सुरु आहे. करुणा मुंडे आज पत्रकार परिषद घेतली आणि आपण कशा त्यांच्या पहिली पत्नी आहोत हे सांगितलं. त्याबाबत त्यांनी काही पुरावे ही सादर केलेत.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायद्यानुसार खटला ही दाखल केला आहे. त्यात धनंजय मुंडे यांना कोर्टाने दोनदा समन्स बजावलं आहे. मात्र, त्यांनी समन्स स्वीकारलेलं नाही. आपल्या केवळ दोनच मागण्या आहेत. एक आपल्या राजकारण करू द्या आणि दुसर आपल्या विरोधात खोट्या केसेस करू नयेत, असे यावेळी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आता राजकारणात देखील आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. या आधी देखील करुणा मुंडे यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभेची निवडणुक लढविली होती या निवडणुकीत करुणा मुंडे यांना ६१ मते मिळाली होती. आता करुणा मुंडे यांनी शिवशक्तीसेना पक्षाची स्थापना करत राजकारणात उतरत असल्याचे जाहीर केले आहे, आगामी निवडणुका त्या बीडमधून लढणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले असून, धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांचा सामना रंगणार आहे.

हे सुद्धा वाचा
पुण्याची ताकद ‘गिरीश बापट’ यांनी घेतला अखेरचा श्वास

कर्नल पुरोहितांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुख्यमंत्री शिंदे डॉक्टर झाले याचा आनंद झाला पण…; राऊतांचे चिमटे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी