35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीय‘फडणवीसांनी अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं भुषवली‘

‘फडणवीसांनी अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं भुषवली‘

टीम लय भारी:

मुंबई: विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन सुरु आहे.आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या आधिवेशनात आज महत्वाच्या नेत्यांची भाषणं झाली. यावेळी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली. देवेंद्र फडणवीसांनी अडीच वर्षांत सगळी महत्वाची पदं भुषवली असा टोला लगावला. अजित पवार आजच्या भाषणात म्हणाले की, ‘मिरच्या झोंबल्या’च पाहिजेत. आज त्यांनी आपल्या भाषणात बंडखोर आमदार आणि राज्यपालांना चांगलेच धारेवर धरले.तर देवेंद्र फडवीसांनी अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं कशी
भुषवली. ते देखील आपल्या मिश्कील शैलीत सगळयांना सांगितले.

फडणवीस मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाले. विरोधी पक्ष नेता देखील झाले. अजून पुढची अडीच वर्ष आहेतच. तसेच दर वेळी एकनाथ शिंदे हे एक शिवसैनिक आहेत. हे सांगण्याची गरज नाही. असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना यावेळी लगावला. अजित पवारांनी आपल्या रांगडया भाषेत आज राज्यपालांचा देखील खरपूस समार घेतला. राज्यपालांनी 30 जूनला गोपनीयतेची शपथ दिली. 4 जूलै विश्वासदर्शक ठराव पास करुन घेतला. ते सध्या अॅक्शन मोडमध्ये आहेत. आमच्या काळात सव्वा वर्षे12 आमदारांचा प्रश्न तसाच चिघडत ठेवला.

एकनाथ शिंदेची काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप तोंड भरुन स्तूती केली. समर्थन केले. मग सत्ता असतांना त्यांना केवळ नगरविकास खातेच का दिले. ते एवढे मोठे होते. तर अनेक महत्वाची खाती त्यांना मिळायला हवी होती. ते सर्वगुणसंपन्न होते. तर छोटेसे रस्तेविकास महामार्ग खातेच त्यांना दिले. जनतेशी संबंधीत खातं का दिले नाही? असा खडा सवाल विचारला.या वेळचे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांना 11 तारखेला सुप्रिम कोर्ट निर्णय देणार आहे त्यापूर्वीच विश्वासदर्शक ठराव घेतला. ठराव इतका घाईने का घेेतला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आम्ही सरकारमध्ये असतांना राज्यपाल एकनाथ शिंदेआणि मला थांबायाला सांगायचे.आमच्याशी चर्चा करायचे परंतु 12 आमदारांचा निर्णय शेवटपर्यंत दिला नाही. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर राज्याला विधानसभा अध्यक्ष मिळालाच नाही. आता चार दिवसांत मिळाला. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही अशी जनता याचा विचार करत आहे असा इशाराही अजित पवारांनी यावेळी दिला.

हे सुध्दा वाचा:

माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बहुमत चाचणीत महाविकास आघाडी तीन आकडी संख्येच्या आत

मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे बाप-लेकाला डिवचले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी