28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयशिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, शिवसेना माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, शिवसेना माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

टीम लय भारी

 नांदेड :  देगलूरमधून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. देगलूरमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवबंधन सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे (Former Shiv Sena MLA Subhash Sabne joined BJP).

साबणे यांच्या भाजप प्रवेशावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आम्ही पंढरपूर जिंकलं. तुम्हा तीन पक्षांच्या विरोधात आम्ही ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. तसेच कराडच्या कृष्णा कारखान्यात २१ पैकी २१ जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरमधील जागा जिंकणारच. असे म्हणत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

BJP : ‘भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुध्दा ….

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

Vidyasagar rao

 ८ तारखेला साबणे उमेदवारी अर्ज भरणार

 देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार घोषित केला आहे. ८ तारखेला मोठी रॅली काढून साबणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येतील, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

नवी मुंबईत भाजपला धक्के पे धक्का ! नगरसेवकांचा BJP ला रामराम, NCP मध्ये केला प्रवेश

‘Is this Ram Rajya? No, this is killing Rajya’: West Bengal CM Mamata Banerjee slams BJP govt over Lakhimpur Kheri violence

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी