32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रआता राॅकेलप्रमाणे पेट्रोल होणार इतिहास जमा

आता राॅकेलप्रमाणे पेट्रोल होणार इतिहास जमा

टीम लय भारी

अकोलाः येत्या पाच वर्षांत पेट्रोल मिळणार नाही. पेट्रोलवर बंदी घालण्यात येणार आहे. देशात इंधनाच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, असे असतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केले आहे. देशातून आता पेट्रोल संपुष्टात आणून त्यावर बंदी घालण्यात येईल असे म्हटले आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 36 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहूणे म्हणून नितीन गडकरी बोलत होते.

लवकरच दुचाकी अणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन इथेनाॅल आणि सीएनजीवर आधारित असतील. विदर्भात तयार होणारे बायो इथेनाॅल वाहनांमध्ये वापरले जात आहे. विहिरीच्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन बनवता येते. ते 70 रुपये प्रति किलो दराने विकता येते. इथेनाॅलच्या निर्णयामुळे 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. नितीन गडकरी म्हणाले, केवळ गहू, तांदूळ, मका लावून कोणताही शेतकरी आपले भविष्य बदलू शकत नाही. शेतकरी हा केवळ ‘अन्नदाता न राहता ऊर्जा’दाता बनण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

काही वर्षांपूवी आपल्या देशात ‘राॅकेल ‘म्हणजेच ‘केरोसीन’ मुबलक प्रमाणात मिळत होते. ते खुल्या बाजारात मिळत होते. त्यावर सरकारने बंदी घातली. त्यानंतर रेशनवर राॅकेल मिळत होते. त्यावर देखील मर्यांदा आल्या. त्यामुळे राॅकेल आता इतिहास जमा झाले आहे असे म्हटले तर ती ते चुकीचे ठरणार नाही. राॅकेल आणि स्टोव्ह हे गरीब लोकांचे अन्न शिजवण्याचे एक साधन होते. आता राॅकेल मिळते. मात्र ते खुलेआम मिळत नसल्यामुळे चढया दराने विकले जाते. पेट्रोल बंदीनंतर त्याचा काळा बाजार होवू नये याची खबरदारी मात्र शासनाने घ्यायला हवी. आपल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तिची जपणूक करण्यासाठी हा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : भारतातही होणार आता ड्रॅगन फ्रुटची शेती

टोल कर्मचारी आणि वारकऱ्यांमध्ये रंगली जुगलबंदी

VIDEO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा अडचणीत?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी