29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रगुरूपोर्णिमेसाठी गुलाब खरेदी करताय? मग 'हे' वाचायलाच हवे

गुरूपोर्णिमेसाठी गुलाब खरेदी करताय? मग ‘हे’ वाचायलाच हवे

टीम लय भारी 

मुंबई : आज गुरूपोर्णिमा, गुरू शिष्याचे अतुट नाते उलगडणारा दिवस. राज्यात अनेक ठिकाणी आजचा दिवस उत्साहात साजरा करण्यात येत असून अनेकजण आपल्या गुरूंविषयी ऋण व्यक्त करीत आहेत. यावेळी कोणी फुल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू तर कोणी सोशल मिडीयावर पोस्ट करीत गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. दरम्यान गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने गुलाबाची आवक वाढल्याने गुलाबाचे दर चक्क तीनपट वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

गुरूपोर्णिमेनिमित्त गुलाबाला ‘अच्छे दिन’ आले आहेत. शाळा, महाविद्यालयातील मुले, मोठी माणसे, भाविक सुद्धा आज गर्दी करून आपल्या गुरूवर्यांसाठी गुलाब खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. यावेळी गुलाबाची वाढलेली आवक पाहून त्याचे वाढलेले दर सुद्धा  या निमित्ताने पाहायला मिळाले. पूर्वी गुलाब 50 रुपये डझन मिळत असे परंतु आता त्याची किंमत 150 म्हणजेच किमतीच्या तीनपट झाली आहे.

आजचा गुरूपोर्णिमेचा दिवस केवळ गुरूंसाठीच नाही तर गुलाब आणि गुलाब विक्रेत्यांसाठी सुद्धा महत्त्वाचा मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा…

मुंबईकरांनो.. गरज असेल तरच घराबाहेर पडा, शहरात पावसाचा जोर वाढला

होऊ द्या चर्चा…! पुन्हा मुख्यमंत्री शिंदे चर्चेत

पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी