30 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeआरोग्यadulteration : पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसह 13 कंपन्या...

adulteration : पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसह 13 कंपन्या मध म्हणून विकतात साखरेचा पाक!

मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ (adulteration) होत असल्याचा ‘सीएसई’चा दावा

टीम लय भारी

मुंबई : मध आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. आयुर्वेदामध्येही मधाचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. मात्र आता देशातील पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसह अनेक मोठ्या कंपन्यांच्या मधामध्ये भेसळ (adulteration) असल्याची माहिती समोर आली आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटने (सीएसई) केलेल्या तपासातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (adulteration: 13 companies including Patanjali, Dabur, Baidyanath, Zandu, Hitkari and Apis Himalaya sell sugar syrup as honey!)

सीएसईने 13 छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात 77 टक्क्यांपर्यंत भेसळ (adulteration) असल्याचे दिसून आले. मधाचे एकूण 22 सँपल्सपैकी फक्त पाच सँपल्स चाचणीत यशस्वी ठरले आहेत. सीएसईने केलेल्या अभ्यासात पतंजली, डाबर, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि एपिस हिमालयसारख्या कंपन्यांचे मध शुद्धतेचे प्रमाण तपासणा-या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरले आहे.

ही भेसळ शरीराला अपायकारक

सीएसईच्या महासंचालक सुनीता नारायण यांनी 2003 आणि 2006 मध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या केलेल्या तपासणीत त्यात जी भेसळ दिसून आली त्यापेक्षा भयानक भेसळ मधात केली जात आहे. ही भेसळ आपल्या शरीराला अपायकारक आहे. ज्या 13 मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले गेले त्यापैकी 10 एनएमआर चाचणीत अयोग्य ठरले. या 10 पैकी 3 नमूने भारतीय मापदंडानुसारही नव्हते, अशी माहिती दिली आहे.

मात्र डाबर आणि पतंजलीने या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचे या कंपन्यांचे म्हणणे आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे.

आमच्या कंपनीचे मध 100 टक्के शुद्ध – डाबरफूड

डाबरफूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचे योग्यरित्या पालन करण्यात आल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे. आमच्या कंपनीचे मध 100 टक्के शुद्ध आहे. तसेच जर्मनीमध्ये झालेल्या एमएमआर चाचणीतही तो यशस्वी ठरला होता. आम्ही ठरवण्यात आलेले 22 मापदंड पूर्ण करतो. नुकताच जो अहवाल समोर आला तो प्रायोजित असल्याचे वाटत आहे, असे डाबरच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

आम्ही 100 टक्के नैसर्गिक मध तयार करतो – आचार्य बालकृष्ण

पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांनी सांगितले की, आम्ही 100 टक्के नैसर्गिक मध तयार करतो. प्रक्रिया केलेल्या मधाला अधिक प्रमोट केलं जावं यासाठी नैसर्गिकरित्या मध तयार करणा-या कंपन्यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे, असं म्हटलं आहे.

याआधी एफएसएसएआयने देशात आयात केला जाणारा मध गोल्डन सिरप, इनव्हर्ट शूगर सिरप आणि राईस सिरपची भेसळ करून विकला जात असल्याचं आयातदारांना आणि राज्यांच्या खाद्य आयुक्तांना सांगितलं होतं. दरम्यान सीएसईच्या टीमनं याची माहिती घेतली असता एफएसएसएआयनं ज्या गोष्टींची भेसळ होत असल्याची माहिती दिली होती ती उत्पादनं आयात केली जातच नसल्याचं समोर आलं. चीनमधील कंपन्या फ्रक्टोजच्या रुपात हे सिरप भारतात पाठवतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी