35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यहोळीनंतर भिंतीवरील डाग काढायचे आहे? मग फॉलो करा 'या' टिप्स

होळीनंतर भिंतीवरील डाग काढायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

यंदा 24 आणि 25 मार्चला होळीचा सण (Holi 2024) साजरा करण्यात येणार आहे. होळी म्हटलं की रंग आणि पाणी या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर येतात. ते म्हणतात ना होळीच्या दिवशी आपला वैरी सुद्धा आला आपल्या रंग लावायला आला तर आपण त्याला रंग लावून सर्व जुण्या गोष्टी विसरून जातो. (after Holi 2024 Want to remove stains from walls ) होळीच्या दिवशी रंगांशी खेळला नाही तर होळीमध्ये मजा नाही. पण, होळीच्या मजा-मस्ती मध्ये जर घरच्या भिंती खराब झाल्या तर आपल्याला टेन्शन येऊन जाते. कारण गुलाल आणि रंगाचे डाग हे भिंतीवरून लवकर निघत नाही, त्यामुळे नंतर हे डाग खूप घाणेरडे दिसतात. होळीनंतरही तुमचे घर सुंदर राहावे असे वाटत असेल तर आम्ही घेऊन आलो आहो तुमच्यासाठी काही खास टिप्स...

यंदा 24 आणि 25 मार्चला होळीचा सण (Holi 2024) साजरा करण्यात येणार आहे. होळी म्हटलं की रंग आणि पाणी या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर येतात. ते म्हणतात ना होळीच्या दिवशी आपला वैरी सुद्धा आला आपल्या रंग लावायला आला तर आपण त्याला रंग लावून सर्व जुण्या गोष्टी विसरून जातो. (after Holi 2024 Want to remove stains from walls) होळीच्या दिवशी रंगांशी खेळला नाही तर होळीमध्ये मजा नाही. पण, होळीच्या मजा-मस्ती मध्ये जर घरच्या भिंती खराब झाल्या तर आपल्याला टेन्शन येऊन जाते. कारण गुलाल आणि रंगाचे डाग हे भिंतीवरून लवकर निघत नाही, त्यामुळे नंतर हे डाग खूप घाणेरडे दिसतात. होळीनंतरही तुमचे घर सुंदर राहावे असे वाटत असेल तर आम्ही घेऊन आलो आहो तुमच्यासाठी काही खास टिप्स…

होळीला रंगापासून केसांचे संरक्षण करायचे आहे? मग नक्की करा ‘या’ 4 तेलांचा वापर

  1. तुमच्या घराच्या भिंतींवर कुठेही रंग असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोड्याचे द्रावण तयार करा. हे द्रावण स्प्रे बाटलीत ठेवा आणि रंगीत भागावर फवारणी करा. आता भिंतीला कापडाने घासून घ्या असे केल्याने रंग सहज निघतो.

2. याशिवाय भिंतीवरील रंग काढण्यासाठी लिंबू घ्या आणि त्यावर बेकिंग सोडा टाका. आता रंगीत भागावर लिंबू चोळा. यामुळे रंग सोलण्यास सुरवात होईल, शेवटी पाणी घालून भिंत स्वच्छ करा. रंग सहज निघेल.

3. भिंतीवरील रंग काढण्याचा आणखी एक स्मार्ट मार्ग म्हणजे एका भांड्यात गरम पाणी घेणे, त्यात सुती कापड भिजवणे आणि ते स्वच्छ करण्यासाठी रंगीत भागावर घासणे. यामुळे डागही सहज कमी होतील.

रंग खेळताना त्वचेला कसं जपाल; घ्या जाणून

4. भिंतीवरील रंगाचे डाग दूर करण्यासाठी व्हिनेगर ही खूप उपयुक्त ठरेल. यासाठी एका भांड्यात एक कप व्हिनेगर घाला, त्यात लिंबाचा रस घाला, बेकिंग सोडा आणि डिश वॉश मिसळून द्रावण तयार करा. स्पंजने भिंत स्वच्छ करा. यामुळे भिंतीची चमक पूर्वीसारखी परत येईल.

5. घराच्या भिंतीवर कुठेही डाग असल्यास त्या ठिकाणी टूथपेस्ट लावा आणि ब्रशच्या साहाय्याने हलक्या हाताने घासून घ्या, रंग हलका व्हायला लागल्यावर पाण्याने भिंत स्वच्छ करा. यामुळे रंगही सहज निघून जाईल.

घरच्या बाकी जागेची अशी करा स्वच्छता
बहुतेक रंग दारावर लावले जातात. अशा परिस्थितीत, त्यांचे हँडल्स अँटी-बॅक्टेरियल क्लिनरने पूर्णपणे स्वच्छ करा. खिडक्यांवरील रंग देखील स्वच्छ करा. गालिचा बाहेर काढून उन्हात ठेवा आणि नीट स्वच्छ करा, जेणेकरून त्यात बॅक्टेरिया वाढणार नाहीत. शौचालय साफ करताना, शौचालयाचे हँडल साफ करणे सुनिश्चित करा. जर रंगाचे डाग असतील तर साबणाशिवाय अँटी-बॅक्टेरियल क्लिनरचा वापर केला जाऊ शकतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी