30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयप्रणिती शिंदे करणार का राम सातपुतेंना घराचा आहेर...

प्रणिती शिंदे करणार का राम सातपुतेंना घराचा आहेर…

 प्रणिती शिंदे म्हणजेच सुशील कुमार शिंदेच्या कन्या या निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार का अशी आता चर्चा होताना दिसते. ३ टर्म च्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला २००९ साली सुरुवातझाली. त्या आधी त्या एका NGOमार्फत सामाजिक कार्य करत होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री , तसेच आंध्रप्रदेश राज्याचे राज्यपाल असलेल्या सुशील कुमार शिंदेच्या कन्या यांना हाच राजकीय वारसा लाभलेला आहे. २००९ साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढत कम्युनिस्ट नेते आडाम  मास्तर यांचा पराभव करत त्या पहिल्यांदा आमदार झाल्या

प्रणिती शिंदे म्हणजेच सुशील कुमार शिंदेच्या कन्या या निवडणुकीत वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार का(Praniti Shinde VS Ram Satpute)अशी आता चर्चा होताना दिसते. ३ टर्म च्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांच्या राजकीय प्रवासाला २००९ साली सुरुवातझाली. त्या आधी त्या एका NGOमार्फत सामाजिक कार्य करत होत्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री , तसेच आंध्रप्रदेश राज्याचे राज्यपाल असलेल्या सुशील कुमार शिंदेच्या कन्या यांना हाच राजकीय वारसा लाभलेला आहे. २००९ साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढत कम्युनिस्ट नेते आडाम  मास्तर यांचा पराभव करत त्या पहिल्यांदा आमदार झाल्या.त्यांनंतर एमआएएमचे उमेदवार तौफिक शेख यांचा त्यांनी पराभव केला, तर हाजी शाब्दी यांना देखील त्यांनी गेल्या निवडणुकीत हरवून विजय मिळवला.काँग्रेसच्या वर्किंग समितीच्या सदस्य असलेल्या प्रणिती शिंदे या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्यादेखील सदस्य आहेत. त्यामुळे पक्ष संघटन आणि विधिमंडळ या दोन्ही ठिकाणी राजकीय कामाचा अनुभव असल्याचा आणि सुशील कुमार शिंदे यांच्या वैयक्तिक संबंधाचा प्रणिती यांना या निवडणुकीत फायदा होऊ शकतो.
तर राम सातपुते हे भाजपचे पहिल्या टर्मचे आमदार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांचा त्यांनी २५९० मतांनी पराभव केला, तर जयसिद्धेश्वर स्वामींच्या मतदार संघात सक्रिय नसल्याकारणाने त्यांचं तिकीट कापून ती उमेदवारी राम सातपुतेंना दिली असली तरी त्यांचं मतदार संघातील पक्षसंघटनेच काम हि तितकंच प्रबळ असल्याचं मुख्य कारणही त्या मागे आहे. आईवडील ऊस तोड कामगार असल्याने कामानिमित्त माळशिरस येथे स्थायिक झालेले राम सातपुते हे आहेत मूळचे बीडचे. अखिल भारतीय विद्यार्थी संघटने पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.  भाजप युवा मोर्चार्चे ते अध्यक्ष देखील होते. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या ते फार जवळचे आहेत असंही बोललेलं जातं. राम सातपुते यांना राजकीय वारसा नसला तरी त्यांचं संघटनात्मक पातळीवरील काम पाहूनच त्यांना हि उमेदवारी देण्यात आलेली आहे.
मागील निवडणुकीत उत्तम जानकरांविरोधात लढताना राम सातपुतेंना मोहिते पाटलांनी दिलेला पाठिंबा हा बराच फायद्याचा ठरला. पक्षाचा आदेश म्हणून मोहिते पाटलांनी त्यावेळेस राम सातपुतेंना पाठींबा दिला खरा पण त्यानंतरही पक्षाकडून मोहिते पाटलांच्या बाजूने उमेदवारी जाहीर न झाल्याने , हाती काही न लागल्याने मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पुन्हा परतले. त्यावेळेस पक्षप्रवेशाचे भाषण करताना ” राम सातपुतेंना एका रात्रीत आमदार केला, आता एका रात्रीत पार्सल बीडला पाठवणार” असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी चांगलाच टोला लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी