33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeआरोग्यकोविड साथीमागे बिल गेट्स? अखेर आरोपांवर बिलभाईंनी प्रथमच सोडले मौन; जाणून घ्या...

कोविड साथीमागे बिल गेट्स? अखेर आरोपांवर बिलभाईंनी प्रथमच सोडले मौन; जाणून घ्या काय म्हणाले गेट्स …

गेट्स यांनी 2015 मध्ये एका संसर्गजन्य विषाणूबद्दल चेतावणी जारी केली होती. या विषाणूमुळे एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते. “पुढील काही दशकांत एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यास, तो युद्धाऐवजी अत्यंत संसर्गजन्य विषाणूमुळे होण्याची शक्यता आहे,” असे बिल गेट्स यांनी 2015 मध्ये TEDx परिषदेत सांगितले होते. तथापि, जेव्हा प्रत्यक्षात कोविड साथीत गेट्सच्या अंदाजानुसार अशा गोष्टी घडल्या, तेव्हा लोकांनी या महामारीसाठी त्यांनाच लक्ष्य केले. गेट्स यांनीच नियोजनपूर्वक हा विषाणू तयार केल्याचे आरोप केले गेले.

जगभरातील भयानक कोविड साथीमागे बिल गेट्स असल्याचे या महामारीच्या प्रकोपासून सातत्याने होत आहेत. अखेर या सततच्या आरोपांवर बिलभाईंनी प्रथमच सोडले मौन! जाणून घ्या काय म्हणाले गेट्स ते … (Bill Gates behind Covid outbreak)

जेव्हा जगभरात कोरोना व्हायरसची पहिली प्रकरणे दिसू लागली, तेव्हा लोकांनी या विषाणूचा इतक्या वेगाने प्रसार कशामुळे झाला, याबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले. त्यासंबंधी अनेक सिद्धांत मांडले गेले, अनेक अफवा पसरवल्या गेल्या. त्यावेळी झालेल्या चर्चा अन् अफवांपैकी सर्वात विचित्र षड्यंत्राचा सिद्धांत होता तो, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे कोरोना व्हायरसच्या साथीमागील सूत्रधार असल्याचा! ही चर्चा अविश्वसनीय व लोकांना आश्चर्यचकित करणारी होती. या सर्व चर्चा, अफवा ऐकून गेट्स स्वतः थक्क झाले होते. आता, जवळपास दोन वर्षांनी त्यांनी याबाबत मौन सोडले आहे.

How To Prevent The Next Pandemic : Bill Gates Writes Book on How to Make Covid-19 the Last Pandemic
बिल गेट्स यांनी कोविड 19 साथ शेवटची ठरावी अशी आशा करत पुढची महामारी काशी रोखणार असे पुस्तक लिहिले आहे. (फोटो क्रेडिट : गुगल)

बिल गेट्स म्हणाले, की कोविडच्या उद्रेकादरम्यान ऐकलेल्या काही गोष्टींमुळे मी आश्चर्यचकित झालो होतो. अशा काळात लोकांना एक बळीचा बकरा (बुगीमॅन) हवा असतो, ज्याला जगात घडत असलेल्या सर्व चुकीच्या गोष्टींसाठी दोष दिला जाऊ शकतो. कोविड साथीदरम्यान, मी ते जाणूनबुजून घडवून आणले असे लाखो संदेश फिरत होते. त्यावेळी मी लोकांचा मागोवा घेत होतो, हे खरे आहे. मात्र, मी लसींमध्ये गुंतलो होतो, तेही लोकांचे जीव वाचवण्यासाठी! बीबीसीचे पत्रकार अमोल राजन यांना दिलेल्या मुलाखतीदरम्यान बिल गेट्स यांनी या विषयासंदर्भात मौन सोडले.

गेट्स म्हणाले, “माझा अंदाज आहे, की लोक अजूनही या साथीच्या षडयंत्राचा सूत्रधार (पडद्यामागील ‘बुगीमॅन’) शोधत आहेत. शास्त्र समजून घेण्यापेक्षा तर्क-वितर्क लढविणे आणि अफवा पसरविणे खूप सोपे आहे. अमेरिकी अध्यक्षांच्या मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौकी यांच्यापेक्षा त्या काळात मला अधिक लक्ष्य केले गेले.” कोविड साथीला रोखणाऱ्या लसीकरणात माझा सहभाग होता, परंतु कोविडच्या उद्रेकात आजिबात हात नव्हता, असे बिल गेट्स यांनी स्पष्ट केले.


गेट्स यांनी 2015 मध्ये TEDx परिषदेत एका संसर्गजन्य विषाणूबद्दल चेतावणी जारी केली होती. 

गेट्स यांनी 2015 मध्ये एका संसर्गजन्य विषाणूबद्दल चेतावणी जारी केली होती. या विषाणूमुळे एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते. “पुढील काही दशकांत एक कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यास, तो युद्धाऐवजी अत्यंत संसर्गजन्य विषाणूमुळे होण्याची शक्यता आहे,” असे बिल गेट्स यांनी 2015 मध्ये TEDx परिषदेत सांगितले होते. तथापि, जेव्हा प्रत्यक्षात कोविड साथीत गेट्सच्या अंदाजानुसार अशा गोष्टी घडल्या, तेव्हा लोकांनी या महामारीसाठी त्यांनाच लक्ष्य केले. गेट्स यांनीच नियोजनपूर्वक हा विषाणू तयार केल्याचे आरोप केले गेले.

हे सुद्धा वाचा : 

भारतात येणार कॅन्सर त्सुनामी; कर्करोगतज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांचा इशारा

VIDEO : धक्कादायक; प्रीस्क्रिप्शन लिहीत असतानाच हृदयरोगतज्ञाला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू

Bill Gates Birthday : सॉफ्टवेअरच्या जगाचे ‘गेट्स’ उघडणारा बिल! जाणून घ्या संपूर्ण प्रवास

कोविड साथीचा रोग सर्व देशभर किंवा जगभर पसरवण्याची गेट्स यांची योजना होती, अशा आरोपाचे सिद्धांत मांडले जाऊ लागले. लसीकरण हे लोकसंख्येचे निर्जंतुकीकरण करण्याचा मार्ग आहे, अशीही टीका झाली. फेसबुक, ट्विटर आणि अगदी इन्स्टाग्रामसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे अशा सिद्धांतांचा प्रसार केला जात होता. फेसबुक (मेटा) व व्हॉटसअॅपने बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनावट व्हिडिओ प्रसारित होण्यापासून पूर्णपणे थांबवू शकले नाहीत.

Bill Gates behind Covid outbreak, कोविड साथीमागे बिल गेट्स, Bill Gates finally breaks silence over allegations, आरोपांवर बिलभाईंनी प्रथमच सोडले मौन, कोरोना व्हायरस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी