32 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरआरोग्यtomato flu : लहान मुलांना टोमॅटो फ्लूची भीती

tomato flu : लहान मुलांना टोमॅटो फ्लूची भीती

भारतात टोमॅटो फ्लूचे सुमारे 82 हून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनप्रमाणे हा आजार पसरु नये या करता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 6 मे 2022 ला टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळून आला. अभ्यासकांच्या मते 1 ते 5 वर्षांची बालके या रोगाची शिकार बनत आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून जगभरात अनेक प्रकारचे साथीचे रोग पसरले आहेत. त्यात कोरोना महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले होते. भारताला देखील या महामारीने वेठीस धरले होते. त्यातून थोडी उसंत मिळाली आहे. इतक्यात मंकीपॉक्स हा त्वचेचा आजार आला आणि आता टोमॅटो फ्लूने डोके वर काढले आहे. भारतात टोमॅटो फ्लूचे सुमारे 82 हून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनप्रमाणे हा आजार पसरु नये या करता आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. 6 मे 2022 ला टोमॅटो फ्लूचा ( tomato flu) पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळून आला. अभ्यासकांच्या मते 1 ते 5 वर्षांची बालके या रोगाची शिकार बनत आहेत.

या रोगाची सुरूवातीची लक्षणे ही कोरोना प्रमाणे आहेत परंतु हा आजार कोरोनपेक्षा वेगळा आहे. हा आजार एक व्हायरल इन्फेक्शन आहे. लहान मुलांमध्ये चिकनगुनिया आणि डेंगू नंतर हा आजार उग्र रुप धारण करू शकतो. या आजारामध्ये शरीरावर लाल रंगाचे पुरळ उठतात. ते खूप वेदनादायक असतात. हे पुरळ मोठे होता. ते टोमॅटोचा आकार धारण करतात. म्हणूनच याला टोमॅटो फ्लू असे म्हटले आहे.

टोमॅटो फ्लूची लक्षणे
हा विकार 5 वर्षांच्या आतील लहान मुलांना होतो. सुरूवातीची लक्षणे ही चिकनगुन‍िया प्रमाणे आहेत. यामध्ये जोराचा ताप येतो. लाल रंगाचे पुरळ अंगावर उठतात. हात, पाय आणि सांधे दुखू लागतात. खूप थकवा येतो. अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि योग्य तपासण्या केल्या पाहिजेत. डेंग्यू, चिकनगुनिया, जीका व्हायरस, वॅरीसेला जोस्टर व्हायरस आणि हार्पिस व्हायरसची तपासणी केली पाह‍िजे. या साठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल टेस्ट केली जाते. जर वरील कोणत्याही आजाराची लक्षणे या तपासणीमध्ये आढळली नाहीत तर टोमॅटो फ्लू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे सुद्धा वाचा

Virushka Scooter Ride : अनुष्का शर्मा आणि विराटची कोहलीची ‘स्कूटर राईड’ला पसंती

Eknath Shinde : सरकार कधी पडणार, एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्ट उत्तर

Reservation : ‘पब्जी’, ‘लुडो’ खेळणाऱ्यांही नोकरीत आरक्षण द्या

केरळमध्ये या आजाराची सुरूवात झाली असल्यामुळे राज्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी केरळमध्ये निपाह या आजाराने थैमान घातले होते.केरळमध्ये टोमॅटो फ्लूचे 80 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवरील काही जिल्ह्यात देखील हे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. रुग्णांवर तातडीने उपचार सुरू आहेत. टोमॅटो फ्लू कशामुळे होतो याचा शोध लागला नाही.

सुरुवातील लहान मुलांच्या अंगावर पुरळ येतात आणि त्यानंतर त्वचा लाल होते. त्वचेची जळजळ होते. फोड येतात. पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि जुलाब होतात.टोमॅटो फ्लू संसर्गजन्य असल्याने या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रम‍ित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळला पाहिजे. तामळनाडू-केरळ सीमेवरील वालारा येथे एक वैद्यकीय पथक ताप, पुरळ आणि इतर आजारांच्या चाचण्या करत आहे.

हा रोग आटोक्या आणण्यासाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वच्छता राखली पाहिजे. तसेच शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे. वरील पैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. या आजारात रुग्णाला आयसोलेट केले जाते. तसेच आराम करण्याचा सल्ला दिला जातो. पुरळांवर गरम पाण्याचा शेक दिला जातो. या रोगाची लक्षणे इन्फ्लूएन्जा सारखी आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी