32 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeराजकीयEknath Shinde : सरकार कधी पडणार, एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्ट उत्तर

Eknath Shinde : सरकार कधी पडणार, एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्ट उत्तर

वेगवेगळ्या विषयांवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या चिंतेविषयी सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, मी त्यांना कामातून उत्तर देईन. आम्हाला राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेवायचे आहे असे म्हणून सरकार कधी कोसळेल या विरोधकांच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार येऊन आता बराच काळ लोटला असला तरीही हे सरकार टीकेल की अजून भक्कम उभे राहिले अशा उलट – सूलट चर्चा सध्या सुरू आहेत. या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी माझ्या कामातून उत्तर देईन असे निक्षून सांगत प्रश्न विचारणाऱ्यांचे आता तोंडच बंद केले आहे. एकनाथ शिंदे यांनी काल सहकुटुंब भीमाशंकर येथे जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते. नाराज विरोधकांकडून हे सरकार कधीही कोसळू शकते. एकनाथ शिंदे कमी दिवसाचे मुख्यमंत्री आहेत असा दावा वारंवार केला जात असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांच्या या भाकितावर चांगलीच चपराक लगावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संपुर्ण कुंटुंबासह काल भीमाशंकर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, भगवान शंकराकडे काहीही मागावे लागत नाही. काय घ्यायचे आणि काय द्यायचे हे शंकराला माहिती असते. राज्यातील कष्टकरी, बळीराजा, सुखी राहू देत,महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होवो, राज्यावरील संकट दूर होऊ दे असे साकडे मी घातले आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.

हे सुद्धा वाचा…

Mumbai Terror Attack : मुंबई 26/11 सारखी उडवून देण्याची धमकी, एकास अटक

भारताचा आणखी एक क्रिकेटपटू निवृत्ती घेणार

Reservation : ‘पब्जी’, ‘लुडो’ खेळणाऱ्यांही नोकरीत आरक्षण द्या

दरम्यान, मुंबई हल्लाच्या धमकी मेसेज विषयी मुख्यमंत्री शिंदे यांना माध्यमांकडून विचारण्यात आले. तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले, धमकी देणारे काही संदेश आले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. आयबी, रॉ, केंद्रीय यंत्रणा तपास करत आहेत. मुंबईवर कुठलेही संकट येणार नाही. पूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे, गृहविभाग, मुंबई पोलीस सक्षम आहेत. त्यामुळे कोणीही कुठलाही हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

वेगवेगळ्या विषयांवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या चिंतेविषयी सुद्धा भाष्य केले. ते म्हणाले, मी त्यांना कामातून उत्तर देईन. आम्हाला राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेवायचे आहे असे म्हणून सरकार कधी कोसळेल या विरोधकांच्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी