26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeआरोग्यCoronavirus : भारतात कोरोनाचे २९८ रुग्ण

Coronavirus : भारतात कोरोनाचे २९८ रुग्ण

Coronavirus मुळे आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू

टीम लय भारी

नवी दिल्ली : कोरोना ( CoronavirusC ) व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना भारतातही त्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २९८ वर पोहोचली आहे. यात ३९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी महत्त्वाची पावले उचलली आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हरियाणा राज्यात सर्वात जास्त म्हणजे १४ परदेशी नागरिकांना आणि तेलंगाणात ९ जणांना लागण झाली आहे. शनिवारी राजस्थान राज्यात ६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने एकांतवासात राहणा-या नागरिकांसाठी नियमावली जारी केली आहे. १४ दिवस घरातच राहण्याचे संशयितांना सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर शहर कोरोनाच्या जास्त प्रसारामुळे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परदेशातून येणा-या नागरिकांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत, तर अनेक देशांतून भारतात येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशामध्ये तपासणी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच अनेक संशयितांवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. परिस्थितीचा आढावा घेवून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. देशातील छोट्या मोठ्या शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा ६४ वर

महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा एका रात्रीत १२ ने वाढला आहे. यामध्ये दहा पॉझिटीव्ह मुंबईत आढळले असून अन्य एक पुण्यात सापडला आहे. आता राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली आहे. यामध्ये विदेशातून आलेल्या आठ जणांचा समावेश आहे. तसेच अन्य तिघांना संसर्गाने कोरोना झाल्याचे त्यांनी सांगितले.

केरळात एकाच दिवशी १२ जणांची भर

केरळमध्ये आज एकाच दिवशी तब्बल १२ नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे केरळमधील करोनाबाधितांची संख्या आता ५२ वर पोहचली आहे. कर्नाटकमध्ये आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे कर्नाटकातील करोनाच्या रुग्णांची संख्या १८ वर गेली आहे. लडाखमध्ये आणखी तीन जण करोना पॉझिटिव्ह, लेहमध्ये दोन तर कारगिलमध्ये एकाला करोनाचा संसर्ग. लडाखमधील करोनाच्या रुग्णांची संख्या १३ वर पोहचली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी