29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यCovid19 : ‘कोरोना’ संसर्ग सहज टाळणे शक्य ( डॉ. सुहास सुर्यवंशी )

Covid19 : ‘कोरोना’ संसर्ग सहज टाळणे शक्य ( डॉ. सुहास सुर्यवंशी )

‘कोरोना’ विषाणूमुळे ( Covid19 ) संपूर्ण जग हादरून गेले आहे. योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन सुद्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना’ संसर्ग कसा टाळता येऊ शकेल यावर डॉ. सुहास सुर्यवंशी यांनी उपाय सांगणारा प्रस्तुत लेख लिहिला आहे.

कोरोना व्हायरसच्या ( Covid19 ) विळख्यात पूर्ण जग अडकले आहे. त्यावर विजय मिळविण्यासाठी एक साधा सोपा उपाय म्हणजे, सामाजिक अंतर ठेवा असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचेनत म्हटले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस ( Covid19 ) प्रादुर्भाव वाढणार नाही ही सोपी गोष्ट. पण तसे होताना आज दिसत नाही आणि त्यामुळे रुग्ण वाढ होताना दिसत आहेत. हीच एक मोठी समस्या आज भीतीदायक होत आहे. त्यामुळे आपल्याला संपुर्ण देशाला लॉकडाऊन ला सामोरे जावे लागत आहे.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रथम आरोग्य म्हणजे काय समजून घेऊ. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक तंदुरूस्त असणे म्हणजेच आरोग्य चांगले असणे ही सर्वसाधारण आरोग्याची व जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या सर्वशृत आहे.

कोरोनामुळे ( Covid19 ) पूर्ण जगाचे आरोग्य धोक्यात आले आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतः कोरोना संक्रमण दूर करू शकतो. त्यासाठी खालील साधे उपाय आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत ठरू शकतील. त्यावर विचार होणे आवश्यक आहे.

१. शासनाने दिलेले सर्व नियम प्रत्येक नागरिकाने कर्तव्यपूर्वक पालन करावेत

२. एक मीटर अंतर ठेवून वागावे

३. घराच्या बाहेर पडू नये (अत्यावश्यक गोष्टी व व्यक्ती सोडून) दुसऱ्या मुळे आपल्याला व आपल्या मुळे दुसऱ्याला ( Covid19 ) संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी.

४. बाहेर पडताना चेहऱ्यावर आपण जो रुमाल, मास्क (कापडी) वापरतो, त्याला वारंवार हात न लावावे. घरी गेल्यावर तो स्वच्छ धुऊन आपण तो परत वापरू शकतो.

५. कोरोनाचा ( Covid19 ) धोका हा फक्त आजारी व्यक्तीकडून होतो असे नाही. लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीकडून देखील कोरोना संक्रमण होऊ शकतो.

६. ५५ ते ६६ वर्ष वय असलेल्या व कोणत्या तरी आजाराने त्रस्त व्यक्ती उदाहरणार्थ ब्लडप्रेशर, साखरेचा आजार, संधिवात, हृदयाचे, किडनीचे, लिव्हरचे आजार.. अशा व्यक्तीसाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

७. कोरोनाचे संक्रमण ( Covid19 ) घशात होते म्हणून – आपण चहा, कॉफी, मीठाच्या पाण्याच्या, हळदीचे दूध, व्हिनेगर याचा वापर करुन गुळणा करू शकतो. सर्दी-खोकला होईल असे कोणतेही थंड प्रकारचे पदार्थ खाऊ नयेत.

८. आपण आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. म्हणजे विटामिन सी जीवनसत्व, आंबट फळे संत्री,मोसंबी लिंबू, आवळा, भाज्या इत्यादी खाणे गरजेचे आहे

९. बाहेरून आल्यावर (बाहेर जाणे टाळलेच पाहीजे) आपण आपले सर्व कपडे स्वच्छ गरम पाण्याने धुणे आवश्यक आहे. शक्य असेल तर साबण लावून अंघोळ करावी म्हणजे सर्व प्रकारचे जंतू संसर्ग घरात जाणार नाहीत. आंघोळीपर्यंत आपण कोणत्याही घरातल्या वस्तूला स्पर्श करू नये.

१०. घरामध्ये आणलेल्या वस्तू, दरवाजाचे हँडेल इत्यादी सर्व अल्कोहोल युक्त सेनीटायझर ने पुसून घ्यावेत.

११. गरजेच्या वेळी आपले हात साबणाने ३० ते ४० सेकंद योग्य पद्धतीने धुवावेत

१२. आपल्याला सर्दी, खोकला, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा स्वतः औषधे घेऊ नयेत

१३. कोरोनाचे ( Covid19 ) संक्रमण एका माणसाकडून दुसऱ्याला होते तर आपण बाहेरच गेलो नाही तर आपल्या घरात आजार येण्याचे काही कारण नाही.

१४. घरातून बाहेर पडताना शरीर पूर्ण झाकेल असेच कपडे वापरावे. चेहऱ्याला मुख्यत: तोंड नाक व डोळ्याला हात लावणे टाळावे. शिंकताना व खोकला असल्यास तोंडावर रुमाल धरावा. कोणत्याही वस्तूला हात लावण्यापूर्वी व नंतर हात स्वच्छ साबणाने धुवावेत फिरताना व बोलताना एक मीटर अंतरावरून वागावे.

१५) मोबाईल स्वच्छ व जंतुविरहित करावा

१६) कोरोना ( Covid19 ) संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, सिस्टर, आरोग्य सेविका, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय  अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचा सामाजिक जिम्मेदारी ठेवून पालन करणे आवश्यक आहे.

आज जागतिक आरोग्य दिन आहे. मी भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून (आरोग्य प्रार्थनेचा) संकल्प करीत आहे. मी कोरोना संक्रमित होणार नाही. माझ्यामुळे माझ्या बंधू भगिनींना संक्रमित होऊ देणार नाही. या देशातून कोरोना हद्दपार होण्यासाठी मी कर्तव्यात कसूर करणार नाही, अशी प्रतिज्ञा करूयात. आज सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !

डॉ. सुहास सुर्यवंशी ( इंदिरा हॉस्पीटल, जामखेड )

हे सुद्धा वाचा

Covid19 : केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

CoronaVirus : राजपुत्रालाही कोरोनाची लागण

Coronavirus : सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, वाचा संपूर्ण पत्र

कोरोनाचे ७७ हजार मृत्यू

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी