30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeआरोग्यIAS Tukaram Munde : ...अशा सरकारी डॉक्टरांना डायरेक्ट डिसमिस करणार; तुकाराम मुंडे...

IAS Tukaram Munde : …अशा सरकारी डॉक्टरांना डायरेक्ट डिसमिस करणार; तुकाराम मुंडे यांचा इशारा

दणकेबाज कारभारामुळे नेहमी चर्चेत असणारे आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आरोग्य खात्याच्या आरोग्य सेवा आय़ुक्तपादाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या धडाडीच्या स्टाईलने काम करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कामचुकार, बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आता तंतरली आहे.

दणकेबाज कारभारामुळे नेहमी चर्चेत असणारे आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आरोग्य खात्याच्या आरोग्य सेवा आय़ुक्तपादाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या धडाडीच्या स्टाईलने काम करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे कामचुकार, बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आता तंतरली आहे. तुकाराम मुंडे यांनी आज बीड जिल्ह्याचा दौरा करत जिल्हा रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कामात कचुराई करणाऱ्या, बेजबाबदार अधिकाऱ्यांची शाळा घेतली. जर कोणी खासगी प्रॅक्टीस केली तर, अशा वैद्यकीय अधिकाऱ्याला डायरेक्ट डिसमिस करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत.
तुकाराम मुंडे यांनी लातुरच्या उपसंचालकांना ३१ तारखेपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल यांना देखील सुचना दिल्या आहेत. तसेच रुग्णांवर उपचाराबाबत कोणतीही कचुराई करु नये, रुग्णांची परवड होऊ नये अशा सुचना करत सज्जड इशारा देखील दिला. बीड जिल्हा रुग्णालयात पाहणी करत त्यांनी रुग्णालयातील आयसीयु वॉर्ड, डिलीव्हरी वॉर्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी तेथे डॉक्टर हजर नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. यावे्ळी त्यांनी सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खासगी प्रॅक्टिस करू नये अन्यथा डिसमिस करू असा सज्जड इशारा दिला.
तुकाराम मुंडे यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्याचा दौरा केला. त्यातच नवीन पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
हे सुद्धा वाचा :
Ravi Rana-Bachhu kadu conflict : बच्चु कडू यांचा शिंदे, फडणवीसांना कोर्टात खेचण्याचा इशारा
Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणाले नोटांवर देवी लक्ष्मी, गणपतीचे फोटो छापा; भाजप आणि कॉँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल
MNS Ameya Khopkar : मुस्लिमविरोधी वक्तव्य करणाऱ्या अमेय खोपकरांना हिंदूंनी फटकारले
आयएएस तुकाराम मुंडे हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात, कर्तव्यात कसलीही कचुराई केलेली त्यांना चालत नाही. त्यामुळे ज्या खात्यात त्यांची बदली होते, तेथे कार्यभार स्विकारल्यानंतर झाडाझडती सुरू होते. अचानक विविध कार्यालयांना भेटी देणे, अधिकारी, कर्मचारी वेळेत कार्यालयात येतात की नाही हे पाहणे, कार्यालयातील रॅकॉर्ड तपासणे, अहवाल मागविणे अशी त्यांची वेगवान कामाची शैली असते. तुकाराम मुंडे यांच्या कामाच्या धडाक्यामुळे त्यांनी एक वेगळी ओळख निर्मान केली आहे. आता आरोग्य खात्यात आल्यानंतर त्यांनी येथे देखील शिस्तबद्धपध्दतीने कामाबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी