31 C
Mumbai
Sunday, September 10, 2023
घरराष्ट्रीयअण्वस्त्रधारी पाकिस्तानला कमी समजू नका; पाकिस्तानच्या महिला मंत्र्याची दर्पोक्ती

अण्वस्त्रधारी पाकिस्तानला कमी समजू नका; पाकिस्तानच्या महिला मंत्र्याची दर्पोक्ती

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी नुकतेच पंतप्रधान मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भारतात त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने झाली. आता पाकिस्तानच्या मंत्री शाझिया मेरी (Pakistan Minister Shazia Mary) यांनी देखील भारतवर अशीच दर्पोक्ती देणारी वक्तव्ये केली आहेत. पाकिस्तानच्या मंत्री शाझिया मेरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत भारताला धमकी दिली. त्या म्हणाल्या, एक कानाखाली दिली म्हणून दुसरा गाल पुढे करणारा पाकिस्तान नाही, प्रत्त्युत्तर कसे द्यायचे हे पाकिस्तानला चांगलेच माहिती आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश असून पाकिस्तानला कोणी दुय्यम समजत असेल तर ती त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल, अशी दर्पोक्ती देखील शाझिया मेरी यांनी यावेळी केली.

खरे तर भुत्तो यांच्या भारतविरोधी वक्तव्यावर माफी मागण्याऐवजी मेरी यांनी भारताला पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची भीती दाखविण्याचा फुटकळ प्रयत्न केला आहे.  भुत्तो यांच्या वक्तव्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. ते म्हणाले होते की, जर तुम्ही तुमच्या घरामागे साप ठेवला तर तो तुमच्या शेजाऱ्यालाच चावणार नाही तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही चावेल. मात्र त्यानंतर देखील पाकिस्तान सरकारमधील मंत्री भारतविरोधी वक्तव्ये करतच आहेत.

हे सुद्धा वाचा
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान नको; पटोलेंनी केली ‘ही’ मागणी

मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

राज्य सरकारचा मोठा निर्णय, 1000 हून अधिक शिक्षकांची भरती करणार

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीत पाकीस्तानने दहशतवादी संघटनांना खतपाणी घालल्याबद्द्ल त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. पाकिस्तान राष्ट्र “दहशतवादाचे केंद्र” असल्याचे देखील त्यांनी यावेळी जोर देऊन सांगितले होते. तसेच चीन देखील पाकिस्तानमध्ये आसरा घेऊन असलेल्या दहशतवाद्यांवर संयुक्त राष्ट्रातून बंदी घालण्याच्या प्रयत्नात अडथळे आणत असल्याचे एस. जयशंकर म्हणाले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील त्यांनी टीका केली होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी