29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeआरोग्यWorld Environment Day : या साध्या सोप्या गोष्टीतून देखील तुम्ही निसर्गाची हानी...

World Environment Day : या साध्या सोप्या गोष्टीतून देखील तुम्ही निसर्गाची हानी टाळू शकता

5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. प्राण्यांच्या अस्तित्वासाठी मानवाकडून पर्यावरणाला सुरक्षित आणि संरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सतत विकासाकडे वाटचाल करणाऱ्या या जगात निसर्गाची मनापासून काळजी घेणारे फार कमी लोक आहेत. त्याचबरोबर आपल्यामुळे पसरवलेली घाण आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाची होणारी हानी तसेच त्याबद्दल काहीच माहिती नसलेले अनेक लोक आहेत. हेच कारण आहे, ज्यामुळे आज निसर्गाचे सौंदर्य नष्ट होत आहे. त्यामुळेच आजच्या युगात निसर्गाबद्दल आणि आपल्यामुळे निसर्गाची होणारी हानी याबद्दल समाजाला जागरूक करणे आवश्यक आहे. या उद्देशाने आपण दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो.

5 जून रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यावरण दिन हा पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघाने सुरू केलेला हा दिवस सर्वप्रथम स्टॉकहोम, स्वीडन येथे साजरा करण्यात आला. 1972 मध्ये स्टॉकहोम येथे पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे 130 देश सहभागी झाले होते. यंदा जागतिक पर्यावरण दिनासाठी संयुक्त राष्ट्रांनी बीट प्लॅस्टिक प्रदूषण ही संकल्पना घोषित केली आहे, जी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय शोधण्यावर भर देते.

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करुया. पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटर ऑईल अशांची पनुर्निर्मिती करुया. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करुया. शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम भांड्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही, बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया. घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करुया.

हे सुध्दा वाचा:

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

डॉ. तात्याराव लाहने, डॉ. रागिणी पारेख यांचा राजीनामा सरकारकडून तातडीने मंजूर

पावसात फिरायला जायचंय ? पण ठिकाण सापडतं नाही… मग हे वाचाच

याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया. आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. आपल्याला पर्यावरणाच्या प्रगतीपथाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भूकंप, दुष्काळ, सागरी वादळे, महापूर, त्सुनामी इ. अशी नैसर्गिक आपत्ती होत आहे. आपणच पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. पर्यावरण दिन रोज मानून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी