35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी 4 जून रोजी संध्याकाळी दादर येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.+

250 हून अधिक हिंदी आणि 50 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या आणि अनेक लोकप्रिय कलाकारांच्या ऑन स्क्रीन आईची भूमिका निभावलेल्या असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी 4 जून रोजी संध्याकाळी दादर येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुलोचना ह्या चित्रपट सृष्टीतल्या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. मुख्य भूमिकांपासून ते आईची भूमिका साकारण्यापर्यंत अशा अनेक भूमिकांसाठी त्या प्रख्यात होत्या. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांना आपलेसे बनवले. अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचा जन्म 30 जुलै 1928 रोजी बेळगावी म्हणजेच कर्नाटकातील खडकलात गावी झाला. सुलोचना यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यानंतर 1946 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

“सासुरवास”, “वहिनीच्या बांगड्या”, “मीठ भाकर”, “सांगते ऐका” आणि “धाकटी जाऊ” यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये मुख्य नायिका म्हणून कामगिरी बजावली. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली ते म्हणजे “जब प्यार किसीसे होता है”, “दुनिया”, “अमिर गरीब”, “बहारों के सपने”, “कटी पतंग”, “मेरे जीवन साथी”, “प्यार मोहब्बत”, “दुनिया” , “जॉनी मेरा नाम”, “वारंट”, “जोशीला”, “डोली”, “प्रेम नगर”, “आक्रमण”, “भोला भला”, “त्याग”, “नई रोशनी”, “आये दिन बहार के”, “आये मिलन की बेला”, “अब दिल्ली दूर नहीं”, “मजबूर”, “गोरा और काला”, “देवर”, “कहानी किस्मत की”, “तलाश” आणि “आझाद” अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे.

हे सुद्धा वाचा

डॉ. तात्याराव लाहने, डॉ. रागिणी पारेख यांचा राजीनामा सरकारकडून तातडीने मंजूर

पंकजा मुंडे म्हणाल्या, अमित शाह यांच्यासोबत मनमोकळी चर्चा करणार

ओडिसा रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट

तसेच धर्मेंद्र, राजेश खन्ना, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राजेंद्र कुमार, संजीव कुमार, नूतन, आशा पारेख, तनुजा, अशा अनेक दिग्गज स्टार्सच्या आईची भूमिका देखील त्यांनी साकारली आहे. सुलोचना यांना 1999 मध्ये पद्मश्री आणि 2004 मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी