28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजआयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांतर्फे १७ कोटींची देणगी

आयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांतर्फे १७ कोटींची देणगी

टीम लय भारी

 मुंबई:  ‘आयआयटी मुंबईने रविवारी पवई येथे माजी विद्यार्थी दिन साजरा केला. यानिमित्ताने आयआयटी मुंबईच्या वारसा प्रकल्पासाठी (लेगसी प्रॉजेक्ट) १९९६ साली विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी १७ कोटींची देणगी देण्याची घोषणा केली.  दरवर्षी विद्यापीठातून उत्तीर्ण होऊन २५ वर्षे पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांतर्फे देणगी दिली जाते.( IIT Mumbai student donate Rs 17 crore)

माजी विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने १९९६ साली उत्तीर्ण झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाषिश चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे स्वागत केले.

MBBS ची विद्यार्थिनी दोन आठवड्यांपासून मुंबईतून बेपत्ता

दिलासादायक: औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेतून आलेला विद्यार्थी निगेटिव्ह, आज 18 जणांचे अहवाल येणार!

 या प्रसंगी बोलताना त्यांनी २०२१ च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत आयआयटी मुंबईचा पहिला क्रमांक आला असून या वर्षी बी.एड या अभ्यासक्रमासाठी जीईई प्रवेशपरीक्षेतून देशभरातील अधिक गुण प्राप्त केलेल्या पहिल्या ५० विद्यार्थ्यांमधील ४३ विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईत प्रवेश केल्याचे सांगून आयआयटी मुंबईच्या यशाचे कौतुक केले. यावेळी उत्कृष्ट सेवेकरिता माजी विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डिस्टींग्विश्ट सव्‍‌र्हिस आणि चॅपटर सव्‍‌र्हिस या दोन पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

विद्यापीठाचा अधिक चांगला विकास करता यावा या उद्देशाने दरवर्षी माजी विद्यार्थी मिळून विविध नवीन योजनांसाठी देणग्या उभारतात. हा उपक्रम वार्षिक माजी विद्यार्थी दिनानिमित्त आयोजित करण्यात येतो.

मित्राच्या बर्थडेसाठी निघालेल्या तरुणाचा गळा चिरुन खून, औरंगाबादेत खळबळ

Murder of college student: Three girls among 9 arrested in Chennai

 २०२१-२२ या वर्षांकरिता ‘गो आयआयटी बॉम्बे’ हा उपक्रम राबविण्यात येण्याचे घोषित केले. यातून प्रयोगशाळा, हॉस्टेल यांच्या पुनर्विकासासाठी तसेच शिष्यवृत्त्यांसाठी निधी उभारण्यात येणार आहेत.  ‘डॉ. प्रमोद चौधरी आलुमनाय कंटीन्युईग एज्युकेशन सेंटर’चा शुभारंभ यावेळी करण्यात आला. हे सेंटर आयआयटीचे माजी विद्यार्थी डॉ. प्रमोद चौधरी यांच्या देणगीतून उभारण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी